Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती
पुणे

सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

विद्यार्थी चळवळीपासून पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंतचा प्रवास; अनेक वर्षांच्या कार्याची पक्षाकडून दखल*

हिंदवी न्यूज |

मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या सहा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळणारे सुनिल विजय गव्हाणे यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात करणाऱ्या सुनिल गव्हाणे यांनी गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला. विद्यार्थी शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिक्षणातील विविध प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध आंदोलने, निवेदने आणि जनजागृतीच्या माध्यमातून भूमिका मांडली. कोविडच्या कठीण काळात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांसाठी ‘कोविड विद्यार्थी-पालक अभियान’ राबवून सामाजिक संवेदनशीलतेची भूमिका त्यांनी मांडली. तसेच विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.

विद्यार्थी संघटनेपासून व्यापक पक्ष संघटनेपर्यंत सहा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रवास करत असताना गव्हाणे यांनी विद्यार्थी प्रश्नांसोबतच राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीचा जवळून अभ्यास केला. या काळात हजारो विद्यार्थी, युवक आणि कार्यकर्त्यांशी ते जोडले गेले.  त्यांच्या या संघटनात्मक अनुभवाची आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत आता पक्षाने त्यांच्यावर फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयक म्हणून अधिक व्यापक जबाबदारी सोपवली आहे.

या माध्यमातून पक्षाच्या विविध फ्रंटल संघटना आणि सेल यांच्यात समन्वय साधणे, त्यांचे संघटनात्मक काम अधिक प्रभावी करणे, विविध विभागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी काम करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

“सहा वर्षांच्या अनुभवाचा उपयोग आता व्यापक संघटन बांधणीसाठी करणार”

*नवीन नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनिल गव्हाणे म्हणाले,“राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून आज सहा वर्षे पूर्ण झाली. या सहा वर्षांत अनेक राजकीय चढ-उतार आले, मात्र पक्षाच्या विचारांप्रती आणि संघटनेप्रती माझी निष्ठा कधीही ढळू दिली नाही. या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला घडवत महाराष्ट्र समजून घेण्याची आणि संघटनात्मक काम करण्याची संधी दिली.”» “आज पक्षाने माझ्यावर फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयक म्हणून नवीन जबाबदारी सोपवली आहे. हा माझ्यासाठी सन्मान नसून आणखी मोठी जबाबदारी आहे. गेल्या सहा वर्षांत विद्यार्थी संघटनेत काम करताना मिळालेला अनुभव आणि महाराष्ट्रभर निर्माण झालेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क याचा उपयोग पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी करेन. आगामी काळात अधिक आक्रमकपणे आणि निष्ठेने काम करत पक्षाची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे गव्हाणे यांनी सांगितले.

 

*“जबाबदारी बदलली; संघर्षाची दिशा तीच!”

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेला सुनिल गव्हाणे यांचा संघटनात्मक प्रवास आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थी चळवळीतील सहा वर्षांचा अनुभव, महाराष्ट्रभर केलेला दौरा आणि कार्यकर्त्यांशी निर्माण झालेले नाते यामुळे नवीन जबाबदारीतही ते पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थी चळवळीपासून पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंतचा हा प्रवास सुनिल गव्हाणे यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Frontals and Cells NCP Maharashtra State Coordinator Sunil Gavhane Appointment
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगार नेते यशवंत भोसले यांच्या तिरंगा रॅलीत आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची उपस्थिती
Next Article संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

August 22, 2026

चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

August 21, 2026

कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 25, 20260
Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?