Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प
पुणे

चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

▪️एमआयडीसी जागा देणार, तर पीएमआरडीए उभारणार प्रकल्प; पुढील ३० वर्षांच्या लोकसंख्येचे नियोजन

▪️जिल्हाधिकारी व महानगर आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक; ग्रामपंचायतींना सीएसआर निधीतून वाहने उपलब्ध करून देण्याची ग्वाही

हिंदवी न्यूज | पुणे 

चाकण औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) आणि परिसरातील गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चाकण, राजगुरुनगर नगरपरिषदेसह परिसरातील १७ ग्रामपंचायती, अशा एकूण १९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसी क्षेत्रातील पॉइंट क्रमांक ४ येथे ईएसआरजवळील ३६.५० एकर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार एमआयडीसी प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणार असून, पीएमआरडीएमार्फत मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिक विस्तारामुळे चाकण व खेड परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. या पार्श्वभूमीवर आज पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १७ गावांचे सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी तसेच नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा बैठक झाली.

महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रस्तावित प्रकल्पाच्या कार्यपद्धतीसह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित प्रक्रिया केंद्रापासून संबंधित सर्व १९ शहरे व गावे २० किलोमीटरच्या अंतराच्या आत असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणे ३ ते १८ किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक सुलभ होणार आहे. संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलित करून त्याचे १०० टक्के वर्गीकरण करणे आणि तो मध्यवर्ती प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवणे आवश्यक राहणार आहे.

पुढील ३० वर्षांच्या लोकसंख्यावाढीचा विचार करून प्रकल्पाची क्षमता निश्चित करण्यात येत असून, प्रतिव्यक्ती प्रतिदिन ३५० ग्रॅम कचरा निर्मितीचा दर गृहीत धरून प्रकल्पाचे नियोजन केले जात आहे. कचरा प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतींना प्रतिटन निश्चित टिपिंग फी अदा करावी लागणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी रीतसर ठराव मंजूर करणे आवश्यक असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

कचरा वाहतुकीसाठी १५वा वित्त आयोग, स्थानिक स्वनिधी किंवा सीएसआर निधीतून वाहने उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे. ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या निधीतून कचरा वाहतूक वाहने खरेदी करणे शक्य नाही, त्यांना सीएसआर निधीतून वाहने उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. मध्यवर्ती प्रकल्पामुळे ग्रामपंचायतींचा कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार कमी होणार असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या व्यवस्थेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार श्री. काळे म्हणाले, “चाकण व खेड एमआयडीसी परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला होता. आता त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. १५वा वित्त आयोग, स्वनिधी आणि सीएसआर निधीतून काही ग्रामपंचायतींना घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या निधीतून वाहने घेणे शक्य नाही, त्यांना सीएसआरमधून वाहने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे चाकण व खेड एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायतींसह अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक ठराव मंजूर करावेत.

बैठकीस पीएमआरडीएचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प विभाग) रिनाज पठाण, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे, खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

Chakan dumping zone
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!
Next Article भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी आक्रमक! महापालिकेच्या आवारात श्वान आणून अनोखे आंदोलन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

August 22, 2026

कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

August 19, 2026

सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती

August 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 25, 20260
Spread the love

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?