Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

September 13, 2026

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 10, 2026

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश
पिंपरी चिंचवड

‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 2, 2026Updated:September 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांची प्रमाणित माहिती देण्याच्या महानगर आयुक्तांच्या विभागप्रमुखांना सूचना

हिंदवी न्यूज | पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्राच्या सुनियोजित आणि शाश्वत विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘प्रारूप संरचना योजने’च्या (स्ट्रक्चरल प्लॅन) कामाला आता गती मिळाली आहे. ही योजना अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती आणि आगामी २० वर्षांचे नियोजन सर्व संबंधित शासकीय विभागांनी येत्या आठ दिवसांत सादर करावे. यात मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या माहितीचा समावेश असावा, असे स्पष्ट निर्देश ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) दिले.

आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’च्या मुख्यालयात डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची समन्वय बैठक पार पडली. या वेळी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, उपमहानगर नियोजनकार सौरभ पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस, एमआयडीसी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, महापारेषण, पुणे मेट्रो, पीएमपीएमएल आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ‘स्ट्रक्चरल प्लॅन’च्या रूपरेषेवर सादरीकरण करण्यात आले. विविध विभागांमधील समन्वय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाल्यानंतर महानगर आयुक्तांनी माहिती संकलनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. “विविध विभागांकडून प्राप्त होणारी माहिती हा नियोजनाचा गाभा आहे. त्यामुळे ही माहिती संबंधित विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष तपासून आणि प्रमाणित करूनच सादर करावी, जेणेकरून भविष्यातील नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही,” असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

*नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

माहिती संकलनात कोणतीही गळती किंवा अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाने तत्काळ एका ‘नोडल अधिकाऱ्याची’ नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अनधिकृत व्यक्तींकडून माहिती गोळा केली जाऊ नये, यासाठी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे आणि नियुक्त अधिकाऱ्यांमार्फतच पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण (डेटा शेअरिंग) करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

आगामी २० वर्षांचा दूरगामी विचार करून सर्व शासकीय संस्थांनी आपापल्या प्रकल्पांचे आणि जागेच्या आवश्यकतेचे प्रस्ताव वेळेत देणे अपेक्षित आहे. सर्व संस्थांच्या एकत्रित समन्वयातून ही योजना अधिक गतिमान करण्यावर ‘पीएमआरडीए’चा भर असून, ही माहिती लवकरात लवकर ‘पीएमआरडीए’च्या नियोजन विभागाकडे सादर करावी, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

'पीएमआरडीए'च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश!
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकलाकार कट्ट्यावर ‘पुण्यश्लोक अहिल्या देवी’ उत्कृष्ट नाटिकेतील बाल कलावंतांचा सन्मान
Next Article ल क्षेत्रीय कार्यालयाची बैठक तहकूब
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026

‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास

September 8, 2026

पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार

September 4, 2026

ल क्षेत्रीय कार्यालयाची बैठक तहकूब

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

By Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 13, 20260
Spread the love

आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 10, 2026

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026

‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?