
हिंदवी न्यूज | पिंपरी
प्रभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने ल क्षेत्रीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रेखा ताई देवकर यांचा सत्कार करण्यात आला.
मात्र, ल क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील उपस्थित नसल्यामुळे बैठक तहकूब करण्यात आली. त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनासमोर चर्चा करता आली नाही. बैठकीत कचरा व्यवस्थापन, प्रलंबित ड्रेनेजची कामे, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची दुरुस्ती तसेच इतर विकासकामे याबाबत ठोस भूमिका मांडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार होती.
अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ न शकल्याबद्दल नगरसेवक योगेश भाऊ लांडगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रभागातील प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजेत!”
अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांचे प्रश्न मांडता न येणे ही बाब गंभीर असून, कचरा, ड्रेनेज, रस्त्यांवरील खड्डे आणि प्रलंबित विकास कामांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक योगेश भाऊ लांडगे यांनी केली.
नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनाने जबाबदारीने काम करून प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.



