Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल. ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल. ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 2, 2026Updated:October 2, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल
६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ६१० कोटी ४४ लाखांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. पहिल्या सहामाहीत विविध कर सवलतींचा लाभ घेत कर भरणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. यंदा ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० नागरिकांनी म्हणजे तब्बल ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन माध्यमातून बिल भरण्यास नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा एसएमएस पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे पहिल्या सहामाहीत कर भरणाऱ्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

गतवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी ६०३ कोटींचा कर भरणा केला होता. यंदा नोंदणीकृत ७ लाख ६६ हजार मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. गतवर्षापेक्षा ६ कोटी ६२ लाख रुपयांची अधिकची वसुली झाल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

*ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती*
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या कराचा भरणा करणे शक्य झाले आहे. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सहामाहीत शहरातील ५ लाख ९ हजार ९०० नागरिकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल ४ लाख ४५ हजार मालमत्ता धारकांनी ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा ऑनलाइनच्या माध्यमातून कराचा भरणा केला आहे.

*वाकड झोनची सर्वाधिक कर वसुली*
महापालिकेची १८ करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. यामध्ये वाकड करसंकलन कार्यालयाने सर्वाधिक तब्बल ८४ कोटी ९१ लाख, त्यापाठोपाठ थेरगाव ५३ कोटी १५ लाख, कस्पटे वस्ती कार्यालयाने ४५ कोटी १९ लाख, किवळेतून ४४ कोटी ९१ लाख, पिंपरी नगर ४४ कोटी ९९ लाख, चिखली करसंकलन कार्यालयाने ४४ कोटी ६१ लाख तर सर्वात कमी तळवडे कार्यालयाने ११ कोटी ९९ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे.

*मागील चार वर्षांत सहामाहीत वसुलीचा वाढता आलेख*
२०२३-२४ : ५९० कोटी ६० लाख
२०२४-२५ : ५१२ कोटी ६२ लाख
२०२५-२६ : ६०३ कोटी ८२ लाख
२०२६-२७ : ६१० कोटी ४४ लाख

निवासी मालमत्ता धारकांची कर  भरण्यात आघाडी*
निवासी : ४ लाख ५१ हजार ७३९
बिगरनिवासी : ४० हजार १९७
मिश्र : १० हजार ४४
औद्योगिक : ३ हजार ६६७
मोकळ्या जमीन : ३ हजार ४८९

मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या सहामाहीत प्रथमच ६१० कोटींचा कराचा भरणा झाला आहे. कर भरून शहर विकासात योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार. यापुढील काळात थकबाकीदार मालमत्तांकडून कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
• डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

 

मालमत्ता कर संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी १८ करसंकलन विभागीय कार्यालयांचे उद्दिष्टनिहाय नियोजन करण्यात आले. प्रत्येक कार्यालयाच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन उपलब्ध आकडेवारीच्या आधारे वसुलीची दिशा निश्चित करण्यात आली. आढावा बैठकांमधून कार्यालयनिहाय प्रगती, थकबाकीदार मालमत्ता आणि वसुलीची स्थिती यांचा सविस्तर आढावा वेळोवेळी घेण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक कर वसुली करण्यात यश आले आहे.
• तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
—

मालमत्ता कर संकलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विभागाच्या वतीने सातत्याने नियोजन करण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रगतीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. करदात्यांना सवलतीचा लाभ घेता यावा आणि कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. त्यामुळेच सहा महिन्यांत ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. पुढील ६ महिन्यात उर्वरित ३३.५२ टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर आणि चालू कर १०० टक्के वसुली करणे एकमेव ध्येय असणार आहे.
• सचिन पवार, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या वतीने साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह
Next Article शोकाकुल वातावरणात विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?