हिंदवी न्यूज |
आळंदी देवाची ,दि.२ : सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे व कैवल्य सतिश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आळंदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोहम तुकाराम भांडवलकर व राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदी नजीकच्या केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यश किरण वानखेडे (अमरावती) व कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर, अहिल्यानगर) या विद्यार्थ्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आले.
आळंदी स्मशानभूमीत एकाच वेळी चार विद्यार्थ्यांच्या चिता जळत असल्याचे ह्रदयद्रावक चित्र पहायला मिळाले.यामुळे आळंदी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी क्लास बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.




