Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी अविष्कार!
पिंपरी चिंचवड

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी अविष्कार!

गीतांच्या निर्मिती मागील आठवणी, रंजक किस्से आणि सुरेल सादरीकरणाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भारावले
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 4, 2026Updated:October 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत जन्माला आलेली गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागच्या असंख्य आठवणी… कधी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या स्वरांची आठवण, तर कधी आशा भोसले यांच्या गायकीचा संदर्भ, कधी शांता शेळके आणि सुरेश भट यांच्या शब्दांमागच्या कथा… अशा शब्द-सूर-आठवणींच्या त्रिवेणीने पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.

अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा सांगीतिक कार्यक्रम झाला.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांनी संपूर्ण प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले. ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा एकाहून एक लोकप्रिय गीतांनी रसिकांना सुरांच्या भावविश्वात चिंब भिजवले.  या गीतांचे सादरीकरण हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरलेच; मात्र त्यामागील कथा आणि आठवणींनी कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली.

एखाद्या गीताची रचना कशी सुचली, शब्दांमधील भाव ओळखून त्याला चाल कशी लाभली, संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, अशा अनेक आठवणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांशी संवाद साधत उलगडल्या. त्यामुळे ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना त्यामागील भावविश्व जाणून घेण्याची नवी दृष्टी रसिकांना मिळाली.

लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या आठवणींसह शांता शेळके, सुरेश भट यांच्या गीतनिर्मितीचा रंजक प्रवास:

ज्येष्ठ गायिका भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रवासातील आठवणी सांगताना पं. हृदयनाथ मंगेशकर भावुक झाले. दोन्ही बहिणींसोबत काम करतानाचे अनुभव, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून ते गाण्याच्या सादरीकरणापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी रसिकांसमोर मांडले. कवयित्री शांता शेळके आणि गझलकार सुरेश भट यांच्या शब्दांमागील भावविश्व उलगडताना गीतनिर्मितीच्या प्रक्रियेतील अनेक रंजक प्रसंगही त्यांनी सांगितले.

 

‘अभिजात मराठी’ ही केवळ भाषेची संकल्पना नसून शब्द, आशय, काव्य आणि संगीत यांच्या समृद्ध परंपरेचा अनुभव आहे, याची प्रचिती या मैफलीतून आली. मराठीतील अभिजात शब्दवैभवाला अभिजात संगीताची जोड देत सादर झालेल्या गीतांनी रसिकांच्या मनात भावनांचे अनेक पदर उलगडले. शब्दांचा अर्थ, त्यातील सूक्ष्म भाव आणि स्वरांची ताकद यांचा सुरेख मिलाफ या मैफलीत अनुभवायला मिळाला.

 

गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी आपल्या भावपूर्ण गायकीने या गीतांना सुरेल साज चढवला. त्यांच्या स्वरांनी ‘माझ्या सारंगा’पासून ‘मोगरा फुलला’पर्यंत प्रत्येक गीताचे भावविश्व जिवंत केले. प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद मैफलीची रंगत वाढवत होती.

तबला साथ डॉ. राजेंद्र दुरकर आणि विक्रम भट, रिदमवर अजय अत्रे, बासरीवर अमर ओक, सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केले.

या कार्यक्रमाला भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची देखील विशेष उपस्थिती होती.

 

…

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर
Next Article कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनस, ग्रॅज्युटी, विमा, समान काम समान वेतनासह विविध मागण्या साठी कामगार मेळाव्यात कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आक्रमक;
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?