हिंदवी न्यूज |
आळंदी,दि.५ आज (सोमवारी) दिनांक पाच रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने आळंदी व परिसरात हजेरी लावली. यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली, मात्र या पावसामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सुमारे वीस मिनिटे पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.




