Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – योगेश बहल

November 26, 2026

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘नियम आणि अटी लागू’ने रंगवला संसारातील नात्यांचा खेळ
पिंपरी चिंचवड

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘नियम आणि अटी लागू’ने रंगवला संसारातील नात्यांचा खेळ

हसता हसता नात्यांचा आरसा दाखवणाऱ्या नाटकाला रामकृष्ण मोरे सभागृहात रसिकांची भरभरून दाद
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 6, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

*
 

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : संसाराच्या गाड्याला दोन चाकं असली, तरी त्याचा प्रवास सुरळीत होण्यासाठी प्रेमाची ऊब, संवादाची सोबत, समजुतीची सावली आणि विनोदाची हलकीशी फुंकरही तितकीच गरजेची असते. नात्यांच्या या गुंतागुंतीच्या वाटेवर कधी रुसवे येतात, कधी फुगवे; कधी अपेक्षांचे ओझे वाढते, तर कधी गैरसमजांच्या सावल्या मनावर दाटतात. याच भावविश्वाला मिश्कील विनोदाची झालर आणि नात्यांच्या वास्तवाची हळुवार किनार देत ‘नियम आणि अटी’ या नाटकाने अभिजात मराठी भाषा सप्ताहातील रंगमंच अक्षरशः फुलवून टाकला. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हास्याच्या लाटांसोबतच टाळ्यांच्या कडकडाटाने कलाकारांचा गौरव केला.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते नाटकाचे लेखक, अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संकर्षण कऱ्हाडे यांनी अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे कौतुक करत, “अभिजात मराठी भाषा सप्ताह हा अतिशय सुंदर आणि चांगला उपक्रम आहे. मराठी भाषा, साहित्य, रंगभूमी आणि कलाविश्वाचा असा उत्सव नागरिकांपर्यंत पोहोचणे ही आनंदाची बाब आहे. नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा. आम्हालाही पिंपरी चिंचवडमध्ये नाटक सादर करण्याची संधी मिळाली, याचा मनापासून आनंद आहे. अशा उत्तमोत्तम सांस्कृतिक उपक्रमांसाठी आम्हाला पुन्हा पुन्हा पिंपरी चिंचवडच्या रसिकांसमोर येण्याची संधी मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता यावा, अशी भावना व्यक्त केली.

 

लेखक संकर्षण कऱ्हाडे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते प्रशांत दामले यांच्या या नाटकातून संसाराच्या रंगमंचावर उमटणाऱ्या असंख्य छटांचा वेध घेतला जातो. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून नव्याने संसार थाटलेल्या दोन तरुणांच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या कुरबुरी, मनातल्या अपेक्षा, अबोल तक्रारी आणि प्रेमाच्या हळुवार क्षणांना रंगमंचावर जिवंतपणा लाभतो. पडद्यावर घडणारा प्रत्येक प्रसंग जणू प्रेक्षकांच्या परिचयाच्या घरातीलच एखादा क्षण असल्याचा भास निर्माण करतो आणि अनेकदा रसिकांच्या चेहऱ्यावर ‘हे तर आपल्या घरातही घडतं’ अशी मिश्कील स्मितरेषा उमटते.

 

पती-पत्नीच्या नात्यातील राग, तक्रार, अपेक्षा आणि गैरसमज यांना केवळ हास्याचा मुलामा देऊन नाटक थांबत नाही, उलट त्या हास्यामागे दडलेल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यांनाही ते अलगद स्पर्श करते. तिच्या शब्दांमधला राग जसा खरा वाटतो, तशीच त्याच्या तक्रारीमागची अस्वस्थताही मनाला पटते. संवादांची लगबग, शब्दांतील चढ-उतार, देहबोलीतील सूक्ष्म बदल आणि भावनांच्या लयीत होणारे प्रसंगांचे रूपांतर यामुळे दोन्ही व्यक्तिरेखा रंगमंचावर साकारलेल्या नसून प्रत्यक्ष जगत असल्याचा अनुभव रसिकांना येतो.

 

या नात्यांच्या गुंत्यात धागा सोडवण्यासाठी येणारा त्रयस्थ व्यक्ती कथेला एक वेगळेच वळण देतो. पती-पत्नीच्या संसाराचा बारकाईने घेतलेला अभ्यास, त्यातून काढलेले निष्कर्ष आणि त्यानंतरचा ‘रोल-प्ले’ या सगळ्या प्रवासातून दोघांनाही स्वतःच्या वागण्या-बोलण्याकडे एका नव्या नजरेने पाहण्याची संधी मिळते. नातं जपण्यासाठी आखलेले ‘नियम आणि अटी’ कधी नकळत त्याच नात्याभोवती अदृश्य कुंपण उभे करतात, याची जाणीव नाटक विनोदाच्या माध्यमातून करून देते.

 

नाटक कुठेही गंभीर समुपदेशनाचा आव आणत नाही किंवा उपदेशाचे ओझे प्रेक्षकांच्या खांद्यावर ठेवत नाही. उलट प्रसंगागणिक हास्याचे फुलोरे उमलवत ते पुढे सरकते आणि त्या हसण्यातूनच मनाच्या दारावर एक विचार अलगद येऊन ठेवतो.

 

संकर्षण कऱ्हाडे यांच्या सहजसुंदर, तडफदार आणि समयसूचक अभिनयाने रंगमंचावर हास्याचे रंग उधळले, तर अमृता देशमुख यांच्या सहज अभिनयशैलीने, भावस्पर्शी देहबोलीने आणि नेमक्या संवादफेकीने व्यक्तिरेखेला अधिक गहिरेपण दिले. दोन्ही कलाकारांच्या अभिनयातून वैवाहिक जीवनातील लाडिक रुसवे, क्षणिक चिडचिड, मनातली धुसफूस, प्रेमाची ओल आणि नात्यांमधील हळवी गुंतागुंत रसिकांच्या मनापर्यंत पोहोचली.

 

वरवर पाहता हास्य-विनोदाची ही कथा असली, तरी तिच्या प्रत्येक विनोदी प्रसंगाच्या पदराआड एखाद्या संसाराचे प्रतिबिंब दडलेले आहे. संसाराचा रथ पुढे नेताना प्रत्येक वेळी तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीची गरज असतेच असे नाही. कधी दोन माणसांनी एकमेकांचे म्हणणे मनापासून ऐकून घेतले, मनात साचलेले शब्द बोलून दाखवले आणि संवादाची दारे उघडी ठेवली, तरी नात्यांमधील अनेक गाठी सहज सुटतात. हाच साधा, पण मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करणारा संदेश नाटक हसतखेळत देऊन जाते.

म्हणूनच ‘नियम आणि अटी’ हे केवळ एका दाम्पत्याच्या आयुष्याची गोष्ट न राहता, आपल्या-तुमच्या घरात, आपल्या-तुमच्या नात्यांत कधी ना कधी उमटलेल्या क्षणांचेच रंगमंचावरचे प्रतिबिंब ठरते. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने सादर झालेल्या या नाटकाने रसिकांना मनमुराद हसवले, नात्यांच्या आरशात स्वतःकडे पाहण्याची संधी दिली आणि संवादाच्या शक्तीची नव्याने जाणीव करून दिली. हास्य, भावना, आत्मपरीक्षण आणि नात्यांची ऊब यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या नाट्यप्रयोगाला रामकृष्ण मोरे सभागृहात मिळालेली रसिकांची भरभरून दाद हीच या रंगमंचाची मनस्वी पावती ठरली.

Abhijat marathibhasha saptah
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसोसाट्याच्या वाऱ्यासह आळंदीत पावसाची जोरदार हजेरी, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
Next Article ‘मंगलगाणी – दंगलगाणी’ ने मराठी संस्कृतीला स्पर्श करीत रसिकांची जिंकली मने!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – योगेश बहल

November 26, 2026

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – योगेश बहल

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, सामूहिक संविधान…

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?