Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!
पिंपरी चिंचवड

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

पीएमआरडीए’कडून १४४ कोटींचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयात जमा.
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 8, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
– संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक रकमेचा लाभ देण्याची ‘पीएमआरडीए’ची ग्वाही

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून आखण्यात आलेल्या ६५ मीटर रुंदीच्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बाधित शेतकरी व खातेदारांशी थेट संवाद साधण्यासाठी हवेली, मावळ आणि मुळशी तालुक्यांत विशेष ग्रामबैठकांचे, तर मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणीचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक रकमेचा लाभ देण्याची ग्वाही ‘पीएमआरडीए’ने दिली आहे. तसेच, १४४ कोटींचा मोबदला ‘पीएमआरडीए’कडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी यापूर्वी खेड तालुक्यातील सोळू तसेच हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे व निरगुडी येथील जमिनींची मोजणी पूर्ण झाली असून, ‘पीएमआरडीए’तर्फे १४४ कोटींचा निधी मोबदल्यापोटी वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित आवश्यक जमिनींच्या संपादनासाठी मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील गावांसाठी ऑक्टोबर महिन्याचे विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दि. ७ ऑक्टोबरपासून ही मोहीम वेगाने राबवली जात आहे.

स्थानिक शेतकरी व खातेदारांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी दि. ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान मावळ आणि हवेली तालुक्यांत ग्रामबैठका पार पडत आहेत. यामध्ये ७ ऑक्टोबर रोजी साळुंब्रे व दारुंब्रे (ता. मावळ) तसेच मांजरी खुर्द व वडकी (ता. हवेली) येथे बैठका पार पडल्या. तर दि. ८ ऑक्टोबर रोजी गोंडुबरे व परंदवडी (ता. मावळ), तर ९ ऑक्टोबर रोजी सांगवडे व धामणे (ता. मावळ) येथे ग्रामबैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, मुळशी तालुक्यातील बाधित गावांमधील खातेदारांशी थेट चर्चा करण्यासाठी मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर रोजी विशेष बैठकांचे सत्र पार पडणार आहे. यामध्ये सकाळी १० वाजता बाधन बुद्रुक येथे पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत पहिली बैठक होईल. त्यानंतर सुस येथे सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सभागृहात, नांदे येथे दुपारी १२ वाजता भैरवनाथ मंदिर सभागृहात, माण येथे दुपारी १ वाजता आणि हिंजवडी येथे दुपारी २.३० वाजता ग्रामपंचायत सभागृहात बैठका पार पडतील. पुढे मारुंजी येथे दुपारी ३.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात, नेरे येथे दुपारी ४.३० वाजता भैरवनाथ मंदिरासमोर आणि जांबे येथे सायंकाळी ५.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात खातेदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे. या बैठकींना पुणे महानगरपालिका आणि ‘पीएमआरडीए’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बाधित जमिनींचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणी मोहीम राबवली जाणार आहे. मुळशी तालुक्यात ९ ऑक्टोबरला नेरे येथून मोजणीला सुरुवात होणार असून, १२ ऑक्टोबरला हिंजवडी, १३ ऑक्टोबरला जांबे, १४ ऑक्टोबरला माण, १५ ऑक्टोबरला मारुंजी आणि १७ ऑक्टोबर रोजी नांदे येथे मोजणी पार पडेल. तसेच, ३०० हून अधिक बाधित खातेदार असलेल्या हवेली तालुक्यात १३ ऑक्टोबर रोजी मांजरी खुर्द (१५५ खातेदार), १५ ऑक्टोबरला कोलवडी (२० खातेदार) आणि १६ ऑक्टोबर रोजी वडकी (१२५ खातेदार) येथील जमिनींची संयुक्त मोजणी केली जाणार आहे. मोजणीनंतरच मूल्यांकनाची रक्कम निश्चित करणे शक्य होणार आहे.

या सर्व बैठकांना संबंधित बाधित खातेदारांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता तसेच उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.

 

“पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘इनर रिंग रोड’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. स्थानिक नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी ग्रामबैठका आणि संयुक्त मोजणीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. संबंधित खातेदार शेतकरी व नागरिकांनी संमती दिल्यास त्यांना अधिक रक्कम मिळेल. तसेच, मोबदला वितरण आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगाने होईल. प्रशासनावर सक्तीच्या भूसंपादनाची वेळ न आणता, संमती आणि सहकार्याच्या भावनेतून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

— पूनम मेहता,सहआयुक्त, जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए

Pmrda inner ring road land aquisition
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा; शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार!- बाळासाहेब गोतारणे
Next Article मैसूर दसरा : परंपरा, इतिहास आणि वैभव – डॉ. शालिनी रजनीश, IAS. मुख्य सचिव, कर्नाटक.
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?