हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal – PPM) प्रदान करून गौरविण्यात आले. शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती महोदयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. या घोषणेनंतर आयोजित पदक अलंकरण समारंभात त्यांना हे पदक बहाल करण्यात आले.
विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय सेवेची आणि कर्तव्यनिष्ठेची पावती मानला जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.




