हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका
हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष मालिकेच्या माध्यमातून सौ. मनीषा योगेश चिंचवडे यांनी नवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच समाजातील महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रगती करावी, कष्ट करण्याची तयारी ठेवावी आणि स्वावलंबी बनावे, असे आवाहन केले.
महिलांनी शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेने स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जावे. स्वावलंबनामुळे महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे बळ मिळते आणि कुटुंबाच्या प्रगतीतही त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरते, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
“महिला सशक्त असेल, तर कुटुंब आणि राष्ट्र दोन्ही सशक्त होतील,” असे सांगत महिलांनी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न राहता इतर महिलांनाही पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव आहे. या निमित्ताने प्रत्येक महिलेने आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवून स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने आणि स्वावलंबी वृत्तीने जीवन जगावे, हाच त्यांचा संदेश आहे.




