Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»महापालिका»बिल्डर-अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहराचे वाटोळे ! नगरसेवक शीतल शिंदे यांचा महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप
महापालिका

बिल्डर-अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहराचे वाटोळे ! नगरसेवक शीतल शिंदे यांचा महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 2, 2026Updated:November 2, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

लाचखोर अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून, आयटूआर प्रकल्पात महापालिकेचा हक्काचा दर्शनी भूखंड डावलण्यात आला. गॅलेक्सी रेसिडेन्शियल प्रकल्पातील अनधिकृत बांधकाम, लोकमान्य हॉस्पिटलमधील अनधिकृत बांधकाम आणि नदीपात्रातील अतिक्रमणांना अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी केला. नवीन आयुक्तांच्या कार्यकाळात १२ अधिकारी लाच घेताना पकडले गेल्याचा दावा करत संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी शनिवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत केली.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील गरवारे कंपनीच्या जागेत महालक्ष्मी डेव्हलोपर्स या व्यावसायिकांनी बांधलेल्या भूखंडावर पालिकेला मोबदला स्वरूपात दिलेला भूखंड हा दर्शनी भागात नसल्याने पालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. प्रीमियर कंपनी च्या जागेत द सेंट्रल पार्क निर्मित रूणवाल रिटेल व्हेंचर्स यासह इतर कंपनीच्या भूखंडावर ‘आयटूआर’ प्रकल्प राबविताना नियमानुसार महापालिकेला मिळणारा मुख्य रस्त्याकडील नागरी सुविधा (अमेनिटी स्पेस) भूखंड न देता, अधिकाऱ्यांशी संगनमत करून पाठीमागील कोपऱ्यातील कमी मूल्याचा भूखंड पालिकेच्या माथी मारण्यात आला आहे. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. यासह शहरात सुरू असलेले आय टू आर प्रकल्पांची चौकशी करावी. तसेच, या प्रकरणी जबाबदार असलेल्या नगररचना व बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

चिंचवड येथील ‘गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ (प्लॉट नं. २५, सर्व्हे नं. २६९) मध्ये मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. टीडीआर, प्रोत्साहनपर चटई क्षेत्र निर्देशांक (इन्सेंटिव्ह एफएसआय) व पूरक चटई क्षेत्र (अॅन्सिलरी एफएसआय) यांच्या नावाखाली तब्बल ३३६ चौ. मी. पेक्षा जास्त अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर करून संपूर्ण एक मजला अनधिकृतपणे बांधण्यात आला. हा मजला विकून सुमारे २.५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या प्रकरणाचे तातडीने तांत्रिक ऑडिट करून बांधकाम व्यावसायिक (मोरया असोसिएट्सचे भागीदार सुरेश पाटील, दत्ता चिंचवडे, तेजस इंगवले व राजकिरण ठाकूर) आणि संबंधित आर्किटेक्ट व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिंदे यांनी केली.

चिंचवडमधील ‘डॅफोडिल्स’ (डॅफोडिल्स प्रोजेक्ट, म/स. प्रथेश डेव्हलपर्स, सुरेश पाटील व खुळे) या प्रकल्पातील अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील भूखंडालागत प्रत्यक्षात ७.५ मीटर रस्ता असताना कागदपत्रांमध्ये ‘शिफ्टेड बाउंड्री’ दाखवून रस्त्याची रुंदी ९ मीटर दाखवण्यात आली आहे. ही इमारत ‘स्पेशल बिल्डिंग’ दाखवून पार्किंगसाठी ५.१ मीटर उंची ठेवून त्यावर थेट ८ मजल्यांचे अनधिकृत बांधकाम लादण्यात आले आहे. नियमांनुसार दोन जिने आवश्यक असताना इमारतीत फक्त एकच जिना आहे. स्वतंत्र फायर जिना (अग्निडाग जिना) पूर्णपणे गायब आहे. इतक्या त्रुटी असताना व फायर एनओसी कशी मिळाली, असा सवाल उपस्थित करत यावर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होते. सदर बांधकाम व्यावसायिक यांचे इतर ठिकाणी सुरू असलेले बांधकामांवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चिंचवड आणि निगडी येथील ‘लोकमान्य हॉस्पिटल’ प्रशासनाकडून धर्मादाय नियमांची पायमल्ली होत असून, गरीब रुग्णांना हक्काच्या मोफत व सवलतीच्या खाटा नाकारल्या जातात. तेथे कार्यरत नर्सिंग, वॉर्डबॉय, स्वच्छता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे कित्येक महिन्यांचे वेतन थकीत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, जुन्या इमारतीवर स्ट्रक्चरल ऑडिट न करता धोकादायक बांधकाम सुरू असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विनापरवाना कॅन्टीन आणि पार्किंगअभावी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, पालिकेने तातडीने काम थांबविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

शहरातील बीआरटी मार्गाचा नियोजनशून्यतेमुळे दैनंदिन वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. कचरा गाड्यांचे नियोजन नसल्याने पाच ते सहा दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, ‘स्मार्ट रस्त्यांवर’ अतिक्रमणे वाढली आहेत. नदीपात्र बुजविण्याचे काम सुरू असून, पालिकेच्या मोकळ्या जागांवरही अतिक्रमणे केली जात आहेत. या अतिक्रमणांमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

पालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यापासून तब्बल १२ अधिकारी लाच घेताना पकडले गेल्याचा दावा शिंदे यांनी केला. प्रशासनाचा अधिकाऱ्यांवर अंकुश राहिलेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही प्रदूषण व सुरक्षेच्या कारणास्तव आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवावीत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

महापालिका अधिकारी नागरिकांची कामे करण्यापेक्षा बिल्डरांकडून वसुली करण्यात अधिक व्यस्त असतात. मंजूर बांधकाम आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकामात तफावत असून, अधिकारी व बिल्डरांच्या संगनमताने अनधिकृत मजले उभारले जात आहेत. आयुक्तांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.

— शितल शिंदे, नगरसेवक, पिंपरी-  चिंचवड महापालिका

https://www.instagram.com/reel/DfO1MV8oC6l/?srtk=MTZxeGp1a3VwNjg0cA==

https://www.facebook.com/share/r/1dyAWJHpTz/

 

builder-official-nexus-city-development-sheetal-shinde
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबरला पुणे मेट्रो लाईन-३ चे ऑनलाइन लोकार्पण
Next Article शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दिन उत्साहात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंवर्धनाची प्रतिज्ञा

August 22, 2026

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सद्भावना दिनानिमित्त सामूहिक शपथ.

August 22, 2026

मनोज सेठिया यांची शहर अभियंतापदी पदोन्नती

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 14, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी  मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा.…

आळंदीतील भराव रस्त्यावर गाड्या थेट माऊली मंदिरासमोर, भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

November 14, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!

November 14, 2026

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?