हिंदवी न्यूज | पिंपरी
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांची जयंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सामुहिक सद्भावना शपथ घेऊन साजरी करण्यात आली. दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी तसेच सर्व धर्म, भाषा व समुदायांमध्ये परस्पर आदर व सद्भावना वाढविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची आणि परस्परांमधील सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ यावेळी घेतली.


