हिंदवी न्यूज | पिंपरी
वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही,कष्टकरी, वंचित समाजासाठी या वर्षी सुद्धा लोकसहभागातून वंचित, कष्टकरी, घर काम करणाऱ्या महिला, रोजंदारी कामगार लोकांसाठी किराणा, दिवाळी फराळ, महिला व पुरुषांसाठी कपडे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिखली येथे वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभिनव उपक्रम घेण्यात आला.
कष्टकरी, वंचित, रोजंदारी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला भगिनी आदींची दिवाळी गोड करावी त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलावे व त्यांची दिवाळी आनंदात जावी हाच या अभिनव उपक्रमाच्या मागे हेतू असल्याचे वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी वुई टुगेदर फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली.
अध्यक्ष मधुकर बच्चे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, क्रांतीकुमार कडूलकर, सलीम सय्यद, अर्जुन पाटोळे, शंकर कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, दिलीप पेटकर , सदाशिव गुरव, सोनाली मन्हास, एम के शेख, सीता केंद्रे, दारासिंग मन्हास, ईशा नेत्रालयचे गणेश कांबळे, विशाल कुंडले, विपला फाउंडेशनचे, वैशाली गायकवाड, दीपक जाधव आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
फाउंडेशनचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सल्लागार रवींद्र सागडे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले









