Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 19, 2026Updated:November 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांचा सविस्तर आढावा

 हिंदवी न्यूज |

पुणे, दि. १९ : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाढत्या नागरिकरणाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाची कामे गतीने पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत या परिसरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, नागरिक उपस्थित होते. रस्ते विकासासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे तांत्रिक सादरीकरण पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नोव्हेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि तांत्रिक बाबी अंतिम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रस्त्यांच्या कामांच्या निविदा २५ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करून २० डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे अलाइनमेंट, भूसंपादन, टीडीआर आणि डीपीआरसंदर्भातील अडचणी तातडीने दूर कराव्यात. रिंगरोडच्या कामाला प्राधान्य देऊन मोजणी प्रक्रियेतील अडचणी सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

*पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनावर भर

परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रियेच्या प्रश्नांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे, सांडपाण्याचा ओव्हरफ्लो रोखणे आणि पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर करावेत. मुळशी धरण आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.

*कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करा

परिसरात उघड्यावर कचरा जाळणे तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाले व नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून दोषींना नोटिसा बजावाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आवश्यकतेनुसार कारवाई करावी. कचरा टाकण्याची ठिकाणे आणि प्रदूषणाची संभाव्य ठिकाणे निश्चित करून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

*वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी समन्वय

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात. पुढील बैठकीपूर्वी सर्व विभागांनी प्रलंबित अहवाल, निविदांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष सुरू केलेल्या कामांचा तपशील सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. यावेळी हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील नागरिकांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.

hinjewadi-man-marunji-development-works-speed-up-collector-jitendra-dudi
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Next Article वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

November 24, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026

चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?