Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

November 28, 2026

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल
आळंदी

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 28, 2026Updated:November 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
  • अवजड सह जड वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी
  • आळंदीत लाखो भाविक येण्याची शक्यता मात्र दुष्काळाचे पार्श्वभूमीवर गर्दी कमी राहील असा ही एक अंदाज
  • परिसरात १२ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, एसटी आणि पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र थांबे

हिंदवी न्यूज | आळंदी

श्री क्षेत्र आळंदी येथे १ ते ८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कार्तिकी यात्रा व संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. या कालावधीत आळंदी आणि देहूगावकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच आळंदी शहरात येणाऱ्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हे निर्बंध १ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ८ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.

४ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी, तर ६ डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यांसाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १० ते १५ लाख भाविक आळंदीत येण्याची शक्यता आहे. यातील अनेक भाविक देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि भंडारा डोंगर येथेही दर्शनासाठी जातात. त्यामुळे आळंदी आणि देहू परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

या मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी –

मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, आळंदी फाटा, माजगाव फाटा, चाकण-शेल पिंपळगाव-वडगाव घेणंद मार्ग, पुणे-दिघी-मॅगझीन चौक आणि मरकळ मार्गावरून आळंदीकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. तसेच भोसे फाटा ते आळंदी आणि देहूगावकडे जाणाऱ्या काही मार्गांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या वाहनांना जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक, चोविसावाडी, विश्रांतवाडी, भोसरी, मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर, कोयाळी कमान आणि मरकळ गाव या पर्यायी मार्गांचा वापर करून इच्छित स्थळी जाता येईल.

आळंदी शहरात प्रवेशासाठीही निर्बंध –

१ ते ८ डिसेंबरदरम्यान पुणे-आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी-आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेणंद-आळंदी आणि मरकळ-आळंदी या मार्गांवरून आळंदीत येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी असेल. यासाठी चऱ्होली फाटा, डुडुळगाव जकातनाका, केळगाव चौक, बोपदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, विश्रांतवड, धानोरे फाटा आणि पीसीएस चौक आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रण केले जाणार आहे.

भाविकांच्या वाहनांसाठी १२ ठिकाणी पार्किंग 

आळंदी आणि देहू येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंग निश्चित करण्यात आली आहेत.

१. देहू रोड, तळेकर पाटील चौक (दक्षिण बाजू) – २ एकर
२. देहू रोड, तळेकर पाटील चौक (उत्तर बाजू) – १ एकर
३. आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव – १० गुंठे (पोलीस वाहनांसाठी)
४. ज्ञानविलास कॉलेज, डुडुळगाव जकातनाक्याजवळ – १० गुंठे (पोलीस वाहनांसाठी)
५. मुंगसे पार्किंग, बोपदेव चौक – ४.५ एकर
६. इंद्रायणी हॉस्पिटलसमोर, चाकण रोड – ९ एकर
७. विश्रांतवड, वडगाव रोड – २५ एकर
८. वडगाव चौक, आळंदी शौचालयाजवळील नगरपरिषद पार्किंग – ३० गुंठे
९. पॉलीबॉन्ड कंपनीसमोर गावडे पार्किंग – ४ एकर
१० एल्युमेरिया मंगल कार्यालय – २० गुंठे
११ बैलगाडा घाट, चऱ्होली – १ एकर
१२. मुक्ताई मंगल कार्यालयासमोर – १ एकर

एसटी आणि पीएमपीएमएलसाठी स्वतंत्र थांबे

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी आणि पीएमपीएमएल बससाठीही स्वतंत्र थांबे निश्चित करण्यात आले आहेत. देहूगावकडे जाणाऱ्या बससाठी डुडुळगाव जकातनाका, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी चऱ्होली फाटा, वाघोली-शिक्रापूरकडे जाणाऱ्या बससाठी धानोरे फाटा चौक येथे व्यवस्था असेल.

चाकणकडे जाणाऱ्या एसटी बससाठी हनुमानवाडी, इंद्रायणी हॉस्पिटल आणि विशाल हॉटेलसमोर थांबा असेल. शिक्रापूर, शेल पिंपळगाव आणि नगरच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी विश्रांतवड, वडगाव रोड येथे थांबा निश्चित करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून सूट –

जड-अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमधून अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि दिंडीतील वाहनांना सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

आळंदी कार्तिकी यात्रा २०२६
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

आळंदीतील कचरा डेपो धगधगतोय! विषारी धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

November 28, 2026

अलंकापुरी परिसरात काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता

November 25, 2026

आळंदीत १ ते ८ डिसेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा

November 18, 2026

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

November 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 28, 20260
Spread the love

अवजड सह जड वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी आळंदीत लाखो भाविक येण्याची शक्यता मात्र दुष्काळाचे पार्श्वभूमीवर गर्दी…

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?