Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली – डॉ. संजय उपाध्ये
पिंपरी चिंचवड

प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली – डॉ. संजय उपाध्ये

विराट हिंदू मेळाव्यात पुरस्कार वितरण
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 27, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

अधर्माची वाढ झाल्यानंतर मी जन्म घेतो असे श्रीकृष्णाने सांगितले असले तरी, हिंदूंनी आता सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही, संख्याबळ दाखवणे ही आजची गरज आहे. बुद्धिवादाच्या नादामध्ये साहित्यिक बुद्धिभेद करीत आहेत. अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तर विवेक बाजूला ठेवावा लागेल. हिंदूंनो एकत्र आलो नाही, तर युरोपियन राष्ट्राप्रमाणे भारतात परिस्थिती उद्भवू शकते. पुन्हा ‘श्रीकृष्ण’ येणार नाही, तर प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली आहे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या विषयावर व्याख्यान देताना केले.

नवरात्र उत्सव व विजयादशमी निमित्त हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी, (दि.२५) हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्यामध्ये ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’; ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०१६’ व निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकाश सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे, समन्वयक कैलास बारणे, मिलिंद एकबोटे, मंदार देशपांडे, चंद्रकांत नखाते, योगिता बारणे, सुरेश भोईर, सुरेंद्र करमचंदानी, सविता एकनाथ नाणेकर, सुजाता पोफळे, महेश कुलकर्णी, अर्थ सल्लागार अनुजा घाडगे, अतुल जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, या राष्ट्रासाठी ज्या अल्पसंख्याकांनी आपले कर्तृत्व दाखवले त्यांना देशवासीयांनी डोक्यावर घेतले. ७५ वर्षात ५ शिक्षण मंत्री अल्पसंख्यांक होते. अन्य देशातील अल्प संख्याकांपेक्षा भारतातील अल्पसंख्यांक सुरक्षित व विकासाचे जास्त लाभार्थी आहेत. भारताशेजारील देशात हिंदूंची संख्या कमी होत असताना भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे हे चिंताजनक आहे. आतापर्यंतच्या शिक्षणाने हिंदुत्वाची वाट लावली आहे. अकबरच मोठा झाल्याचे शिक्षण ठरवून दिले. आता राजकारण सोडून सर्वांनी देशहित डोळ्यापुढे ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. अन्यथा युरोपातील देशाप्रमाणे आपल्या देशाची परिस्थिती होण्याची भीती डॉ. उपाध्ये यांनी व्यक्त केली.

स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. उत्तम दंडीमे यांनी सांगितले की, गुढीपाडवा, ५ एप्रिल २००० रोजी धर्मवीर आर्य, प्रा. एकनाथ नाणेकर, एस. पी. आर्य, चंद्रकांत जगताप, कुमार पारुल, मी आणि इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन “हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान” या संस्थेची स्थापना केली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिंदू धर्म समजून घ्यावा धर्म आणि विज्ञानाची सांगड घालण्यासाठी अंधश्रद्धेतून बाहेर पडावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघरी पोहोचवून पुढच्या पिढीला आदर्श घालवून द्यावा या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभिजीत सोनवणे यांनी सांगितले की, मी भिक्षेकर्‍यांची वैद्यकीय सेवा करतो. दुचाकी वर फिरता दवाखाना घेऊन शहर भर फिरतो, त्यांना सेवा देऊन त्यांचे कौशल्य पाहून त्यांना कष्टकरी करण्याचा प्रयत्न करतो. या भिक्षेकर्‍यांची मुलं दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे मला नागरिकांनी ‘भिकाऱ्यांचा डॉक्टर’ ही पदवी दिली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. भक्त मंदिरात देवाकडे मागत असतात, भिक्षेकरी मंदिराच्या बाहेर भक्तांकडे मागत असतात. या भिक्षेकर्‍यांना मी माणूस म्हणून माणसात आणण्याचा प्रयत्न करत आहे. वेद समजला नाही तरी चालेल परंतु नागरिकांनी समाजाची वेदना समजून घ्यावी, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले.

कुमार जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, हेमदेव थापर, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले, गोविंद बोळे, श्रीमती अलका आर्य, तेजस्विनी जटाळ, पद्मेश कुलकर्णी, बापू मिरजकर, संजय भाट, रमेश अर्धाले यांनी मेळाव्याच्या आयोजनात सहभाग घेतला.

सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

Dr sanjay upadye
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभीमाशंकरचे ६०० एकर जंगल तोडून विद्युत प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध
Next Article जागृती’च्या दिव्य प्रकाशाने आणि एकत्वाच्या संदेशाने उजळला
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?