Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

September 13, 2026

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 10, 2026

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पत्रकारांना हेल्मेटचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार.

सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा मला आनंद आहे-महापौर रवि लांडगे.

हिंदवी न्यूज | पिंपरी
रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी ने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, नगरसेवक विकास साने, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर, सचिव डॉ अमित त्रिपाठी, मा.अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, रो.संतोष मोरे, रो.दीपक सोनवणे, प्रशासकीय संचालक केशव काळदाते, खजिनदार सुनील पाटील पाटील, रो.अविनाश तळवले, रो.स्वप्नील भालेराव, तसेच पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. दीपक सोनवणे यांनी केले. पत्रकार हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, विविध घटना आणि नागरिकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत असतात, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी काहीतरी मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ज्ञानेश्वर विधाटे यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही रोटरीची परंपरा असून,पत्रकार बांधवांसाठी यापुढेही आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

माजी अध्यक्ष संतोष मोरे म्हणाले की, रोटरी क्लबचे सदस्य स्वतःच्या खर्चातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. समाजाच्या हितासाठी आणि गरजू घटकांसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यास रोटरी क्लब सदैव तत्पर राहील.

पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे यांनी पत्रकार संघ आणि पत्रकार महासंघ हे पत्रकारांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणारे घटक असल्याचे सांगितले. मुख्य आधारस्तंभ अरुण उर्फ नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी दोन्ही संघटना एकजुटीने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक विकास साने म्हणाले, पत्रकार कायमच सत्यासाठी लढत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार हे विश्वासाचे माध्यम वाटते. अशा महत्त्वाच्या सामाजिक घटकाच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लबने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. पत्रकारांना हेल्मेटबरोबरच विमा संरक्षण मिळावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाच्या महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे, महासंघांचे कार्याध्यक्ष दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, अशोक कोकणे, अविनाश कांबीकर, विवेक कुलकर्णी, गणेश मोरे, भीमराव बरकडे, संतोष जाधव, प्रवीण कांबळे, माधुरी कोराड, लीना माने, श्रद्धा कोतावडेकर, श्रद्धा प्रभुणे, शेहनाज कुरणे, श्रीधर जगताप, कालिंदर शेख, शफिक शेख,भीमराव तुरुकमारे, नागेश खजुर्गीकर, सीताराम मोरे, देवा भालके,दिलीप देहाडे, प्रदीप सपकाळ, राम बनसोडे, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले तर आभार प्रवीण शिर्के यांनी मानले.  पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित पत्रकारांनी स्वागत केले

Journalist Safety. Helmet destribution
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleल क्षेत्रीय कार्यालयाची बैठक तहकूब
Next Article ‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026

‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास

September 8, 2026

ल क्षेत्रीय कार्यालयाची बैठक तहकूब

September 2, 2026

‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

By Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 13, 20260
Spread the love

आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 10, 2026

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026

‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?