Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

November 28, 2026

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»NEET-UG 2026 मध्ये अतुल्या डोंगरेची दैदिप्यमान भरारी; 670 गुणांसह देशात 498 वा क्रमांक
पिंपरी चिंचवड

NEET-UG 2026 मध्ये अतुल्या डोंगरेची दैदिप्यमान भरारी; 670 गुणांसह देशात 498 वा क्रमांक

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 97.6 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित केल्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी शिस्तबद्ध पद्धतीने केली.

यशाचे श्रेय देताना अतुल्या म्हणाली, “नियमित वर्गांना उपस्थित राहणे, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी मी कायम जोपासल्या. अभ्यासातील शंका तत्काळ शिक्षकांकडून दूर करून घेतल्या. जीवशास्त्रासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकाचा सखोल अभ्यास केला, तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी भरपूर प्रश्नांचा सराव केला. परीक्षेच्या काळात तणाव होता; मात्र पालक आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास कायम राहिला.” भविष्यातील नियोजनाबाबत ती म्हणाली, “उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पुढे आवडीच्या विषयात विशेष प्राविण्य मिळवायचे आहे. त्यानंतर देशातच राहून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे.”

अतुल्याचे वडील बाळासाहेब डोंगरे म्हणाले, “डॉक्टर होण्याचा निर्धार तिने बालपणापासून केला होता. त्या दिशेने तिने सातत्याने मेहनत घेतली. आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहिलो. तिच्या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.”

आई शर्मिला डोंगरे म्हणाल्या, “अतुल्या लहानपणापासून अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती आहे. एखादे उद्दिष्ट निश्चित केले की ते पूर्ण केल्याशिवाय ती थांबत नाही. तिच्या मेहनतीचे आज सार्थक झाले असून तिच्या यशाचा आम्हाला खूप आनंद आहे.” NEET-UG 2026 मधील या उल्लेखनीय यशामुळे अतुल्या डोंगरेने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकन्व्हेअन्स टाळणाऱ्या बिल्डरला महारेराचा दणका; ३० दिवसांत दस्त नोंदणीचे आदेश
Next Article नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026

फिनिक्स अग्निशिखा फाऊंडेशनतर्फे ५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

November 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 28, 20260
Spread the love

अवजड सह जड वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी आळंदीत लाखो भाविक येण्याची शक्यता मात्र दुष्काळाचे पार्श्वभूमीवर गर्दी…

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?