Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»“ज्ञानसूर्य” पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) (दादा) यांना शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
पिंपरी चिंचवड

“ज्ञानसूर्य” पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) (दादा) यांना शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 13, 2026Updated:August 13, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी येथे काल (१२ ऑगस्ट २०२६) सायंकाळी माजी राज्यपाल आणि डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा)(ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून पाटील परिवाराचे सांत्वन केले व दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) दादांच्या निधनाने शिक्षणविश्वावर तीव्र शोककळा पसरली असून, एका महान युगाचा अंत झाला आहे. ज्ञान, संस्कार, दूरदृष्टी आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे एक थोर शिक्षणमहर्षी म्हणून दादा ओळखले जात. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार दिला, नैतिक मूल्यांची जोपासना केली आणि शिक्षणाला खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, साधेपणा, मानवतावादी दृष्टिकोन आणि शिक्षणाप्रती असलेली अखंड निष्ठा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल.

पाटील परिवाराकडून सांत्वनपर भेटीचा स्वीकार :             याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती व ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या कुलपती व अध्यक्षा डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (अभिमत विद्यापीठ), कोल्हापूरचे कुलपती व अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व आमदार श्री. सतेज डी. पाटील, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचे प्र-कुलपती व डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. सौ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणेचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांनी उपस्थितांच्या सांत्वनपर भेटींचा स्वीकार केला.

शोकसभेला शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, कृषी, अध्यात्मिक, शासकीय व वैद्यकीय क्षेत्रांतील असंख्य मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षण समूहातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संपूर्ण विद्यापीठ सभागृह शोकाकुल वातावरणात बुडून गेले होते. उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतीस अत्यंत नम्रभावाने अभिवादन केले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शोक व्यक्त केला. त्यानंतर पवित्र गीता पठण, प्रार्थना आणि दादांच्या जीवनप्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत (Short Film) दाखवली जात असताना सभागृहातील वातावरण पूर्णपणे गहिवरून गेले होते; उपस्थितांचे मन हेलावून गेले, डोळे अश्रूंनी पाणावले.

 

💬डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे):

“दादा हे केवळ एका शैक्षणिक समूहाचे संस्थापक नव्हते, तर आम्हा सर्वांचे भक्कम आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते. ‘शिक्षणातून समाजविकास’ हा त्यांनी दिलेला मंत्र आणि त्यांनी जपलेली मूल्ये हीच आमची खरी पुंजी आहे. त्यांनी उभारलेला हा ज्ञानाचा वटवृक्ष असाच बहरत ठेवणे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने चालणे, हीच त्यांना दिलेली खरी आणि भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.”

 

💬डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी):

“दादांचे संपूर्ण आयुष्य हे मानवता, वात्सल्य आणि निरंतर सेवेचे प्रतीक होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी, ही त्यांची धडपड असायची. त्यांची तीच दूरदृष्टी, साधेपणा आणि आपुलकी आजही आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहे. दादांचे विचार आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतील

Shoksabha
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा;  नाना काटे यांचे  आयुक्तांना निवेदन. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Next Article किवळेतील सेवा रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?