Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

August 30, 2026

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल
पिंपरी चिंचवड

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 30, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान 

हिंदवी न्यूज | पिंपरी 

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील “सा” देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी भाषेतील गाणे ‘गणराज रंगी नाचतो’ हे रेकॉर्ड झाले तेंव्हा मी १३ वर्षाची होते. आशाताईंची गाणी ऐकून मला प्रेरणा मिळते. भाऊसाहेब भोईर यांच्या निमंत्रणाचा मी स्वीकार करते आणि लवकरच पिंपरी चिंचवड शहरासाठी एक सांगीतिक कार्यक्रम करेल असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका श्रेया घोषाल यांनी “२१ वा आशा भोसले पुरस्कार” स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दिले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल

यावर्षीचा हा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते शनिवारी, (दि. २९) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अमित गोरखे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उद्योजक कृष्ण कुमार गोयल, नगरसेवक गौरव घुले तसेच मानसी भोईर- घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग, गौरी लोंढे आदी उपस्थित होते.  हा पुरस्कार रु. १,११,०००/- रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आणि पैठणी मानसी भोईर-घुले यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना प्रदान करण्यात आली.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी श्रेया घोषाल यांना आशीर्वाद देताना सांगितले की, श्रेयाला मी लहानपणापासून बघतो आहे सर्वप्रथम षण्मुखानंद हॉलमध्ये माझेच गाणे गाताना मी तिला पाहिले. तेव्हाच तिला तू खूप छान गाते, असा आशीर्वाद दिला आहे. आता भाऊसाहेब भोईर आमदार व्हावेत अशी इच्छा आहे.

आ. अमित गोरखे यांनी सांगितले की, भाऊसाहेब भोईर हे या शहराचे सांस्कृतिक मंत्री आहेत. भोईर जर यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर, आज ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री झाले असते. अजूनही वेळ गेली नाही, असे म्हणतात प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करून आ. गोरखे यांना प्रतिसाद दिला.

स्वागत, प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, तर उच्छवास आशादीदी आणि याचे हृदय म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत.  लता मंगेशकर यांना देश सन्मानाने दीदी म्हणतो तसेच आता श्रेया घोषाल या आमच्या “छोटी दीदी” आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम करण्यासाठी वेळ द्यावा असा आग्रह केला. याला श्रेया घोषाल यांनी देखील हात उंचावून होकार दर्शविला.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम झाला. यावेळी श्रेया घोषाल यांच्या हस्ते मानसी भोईर-घुले यांच्या “मानसी रेस्कोर” या बँडचे अनावरण करण्यात आले. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफलीचा रसिकांनी आनंद लुटला. यावेळी मानसी भोईर-घुले यांनी देखील गाणी गायली.

तसेच या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेची माहिती देणारी चित्रफीत सादर करण्यात आली. यामध्ये सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला असल्याची माहिती दिली.

Shreya ghoshal
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

August 29, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 30, 20260
Spread the love

Shreya ghoshal

नोकरी मेळाव्याबरोबर शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन

August 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे

August 30, 2026

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

August 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?