Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»“शाश्वत आर्थिक विकासासाठी व्यापक इनोव्हेशन गरजेचे” – विवेक सावंत यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड

“शाश्वत आर्थिक विकासासाठी व्यापक इनोव्हेशन गरजेचे” – विवेक सावंत यांचे प्रतिपादन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 2, 2026Updated:July 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन

पिंपरी (हिंदवी न्यूज)-“देशाचा शाश्वत आर्थिक विकास साधायचा असेल, तर इनोव्हेशन केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख, सर्वसमावेशक आणि व्यापक व्हायला हवे. ग्रामीण भाग, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि तळागाळातील उद्योजकांना सक्षम करणारी नवोन्मेषाची परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी केले.

नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन, देसाई ब्रदर्स लिमिटेड आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या ज्ञान प्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे (एसीआयसी) उद्घाटन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन प्रसंगी अटल इनोव्हेशन मिशनचे अधिकारी आशिष पांडे व दीपाक्षी जिंदल, देसाई ब्रदर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पारेख, सीएसआर हेड डॉ. चंद्रकांत रावळ, ज्ञान प्रबोधिनीचे विश्वस्त सुभाष देशपांडे, निगडी केंद्राचे प्रमुख मनोज देवळेकर, ‘एसीआयसी’चे संस्थापक संचालक यशवंत लिमये व संगीता कुलकर्णी, मुख्य नवोपक्रम अधिकारी ॐकार गुर्जर आदी मान्यवर उपस्थित होते.

विवेक सावंत पुढे म्हणाले, “भारताची लोकसंख्या, कौशल्य आणि स्थानिक समस्यांचे स्वरूप पाहता सामाजिक नवोन्मेषाला मोठी संधी आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यावर भर देताना त्यातून नाविन्यपूर्ण उपाय कसे शोधता येतील, यावर संशोधन व्हायला हवे. शिक्षण, उद्योग, संशोधन संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे काम केल्यास रोजगारनिर्मिती, उद्योजकता आणि शाश्वत विकासाला गती मिळेल. तंत्रज्ञानाचा वापर समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झाला, तर त्याचा व्यापक परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर होईल.”

आशिष पांडे म्हणाले, “ज्ञान प्रबोधिनी हे अटल सामाजिक नवोन्मेष केंद्र (एसीआयसी) सुरू करणारे पुण्यातील पहिले केंद्र आहे. देशभरात अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुमारे २५ एसीआयसी केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी हे केंद्र ग्रामीण आणि तळागाळातील समाजघटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. ज्ञान प्रबोधिनीचे शेतकरी, महिला बचत गट, ग्रामीण नागरिक आणि स्थानिक उद्योजक यांच्याशी आधीपासूनच मजबूत जाळे असल्याने हे केंद्र योग्य ठिकाणी उभारल्याचे समाधान आहे. या केंद्राला देशातील सर्वोत्तम सामाजिक नवोन्मेष केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

या माध्यमातून ग्रामीण भागातील नवकल्पनांना चालना मिळेल, रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच नवोन्मेषाची संस्कृती शालेय वयापासूनच रुजावी, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्योजकीय विचार विकसित करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. ज्ञान प्रबोधिनीचे हे केंद्र महाराष्ट्रातील सामाजिक नवोन्मेषासाठी एक प्रभावी मॉडेल ठरेल, असे मत दीपाक्षी जिंदल यांनी व्यक्त केले.

‘एसीआयसी’च्या माध्यमातून ग्रामीण उद्योजक, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), स्टार्टअप्स आणि सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग सल्ला व निधी उपलब्ध करून देण्याच्या विविध उपक्रमांची माहिती संगीता कुलकर्णी व ओंकार गुर्जर यांनी दिली. बांबू आधारित उद्योग, कृषी व कृषी-जैवतंत्रज्ञान, औषधी वनस्पती, अन्न प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, महिला उद्योजकता, ग्रामीण उद्योग आणि सामाजिक नवोपक्रम या क्षेत्रांमध्ये उद्योगनिर्मितीला विशेष प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत रावळ यांनीही मनोगत व्यक्त केले. मनोज देवळेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. वैभव मोगरेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.

निगडी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेशभरात सहावे स्थान मिळवून ‘डीपीयू’ने राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा; संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये घवघवीत यश!
Next Article शहरात  उद्या ‘व्यसनमुक्त तरुणाई महासंकल्प सभा’
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?