Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»देशभरात सहावे स्थान मिळवून ‘डीपीयू’ने राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा; संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये घवघवीत यश!
पिंपरी चिंचवड

देशभरात सहावे स्थान मिळवून ‘डीपीयू’ने राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा; संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये घवघवीत यश!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 1, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(हिंदवी न्यूज)- शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) प्रतिष्ठित अशा ‘टाइम्स हायर एज्युकेशन सस्टेनेबिलिटी इम्पॅक्ट रँकिंग २०२६’ (Times Higher Education Sustainability Impact Ratings 2026) मध्ये ८३.९ च्या उत्कृष्ट एकूण गुणांसह (Overall Score) देशात ६ वे आणि जागतिक स्तरावर १०१ ते २०० च्या श्रेणीत स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शाश्वत विकास उद्दिष्टांची (SDGs) पूर्तता करण्याच्या निकषांवर हे जागतिक मानांकन जाहीर केले जाते. यामध्ये विद्यापीठाने आरोग्य, शून्य उपासमार आणि पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टांमधील (SDG) महत्त्वपूर्ण कामगिरी:

. SDG 3 – उत्तम आरोग्य आणि कल्याण (Good Health and Well-Being): वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत विद्यापीठाला देशात ४ था आणि जागतिक स्तरावर ३४ वा अत्यंत मानाचा क्रमांक मिळाला आहे. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधनातील विद्यापीठाचे हे यश उल्लेखनीय आहे.

• SDG 2 – शून्य उपासमार (Zero Hunger): कुपोषण निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि अन्न बचतीच्या प्रयत्नांमध्ये विद्यापीठाने देशात ७ वे तर जगात ५२ वे स्थान पटकावले आहे.

• SDG 6 – स्वच्छ पाणी आणि स्वच्छता (Clean Water and Sanitation): पाणी संवर्धन आणि स्वच्छतेच्या बाबतीत विद्यापीठाने देशात ११ व्या स्थानावर, तर जागतिक स्तरावर १०१ ते २०० च्या श्रेणीत बाजी मारली आहे.

डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे): म्हणाले “टाइम्स हायर एज्युकेशनच्या जागतिक क्रमवारीत मिळालेले हे यश आमच्या संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या कठोर परिश्रमांचे आणि दूरदृष्टीचे फलित आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच जागतिक शाश्वत विकासासाठी (Sustainability) योगदान देणे हे आमचे कर्तव्य आहे. हे मानांकन सामाजिक कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याची आमची प्रेरणा अधिक दृढ करते.

“सौ. डॉ. भाग्यश्रीताई पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे): म्हणाल्या “आरोग्य, पाणी व्यवस्थापन आणि शून्य उपासमार सारख्या महत्त्वपूर्ण जागतिक उद्दिष्टांमध्ये जगातील सर्वोत्तम संस्थांमध्ये स्थान मिळवणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचा शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा सिद्ध करते.

हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक टप्पा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती सौ. डॉ. भाग्यश्रीताई पी. पाटील यांच्या मार्गदर्शना – खाली व अखंड पाठबळामुळे साध्य झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांचे मार्गदर्शन, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांचे गतिमान व कुशल नेतृत्व, तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील यांच्या निरंतर प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे या यशाला अधिक बळ मिळाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, धोरणात्मक दिशा आणि शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन, नाविन्यता (इनोव्हेशन) व शाश्वत विकासाप्रती असलेली दृढ कटिबद्धता; यांमुळेच जगातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये ‘डीपीयू’चे (DPU) स्थान मजबूत करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मानांकन
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Next Article “शाश्वत आर्थिक विकासासाठी व्यापक इनोव्हेशन गरजेचे” – विवेक सावंत यांचे प्रतिपादन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?