Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»केंद्र शासनाच्या आयटीआय ग्रेडिंगमध्ये मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची देशात ७ वी तर राज्यात ५ व्या क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी चिंचवड

केंद्र शासनाच्या आयटीआय ग्रेडिंगमध्ये मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची देशात ७ वी तर राज्यात ५ व्या क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) श्रेणीकरण (ग्रेडिंग) जाहीर केले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागाने (आयटीआय) उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत देशपातळीवर मानाचे स्थान मिळविले आहे.′

प्रशिक्षण महासंचालनालयाने आयटीआयद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा चलित ग्रेडिंग पद्धती लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डीजीटी एमआयएस पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व आयटीआयचे मूल्यमापन करण्यात आले.

या ग्रेडिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयने १० पैकी ९.२ गुण प्राप्त करून देशात ७ वा क्रमांक, महाराष्ट्र राज्यात ५ वा क्रमांक, पुणे विभागात २ रा क्रमांक तसेच पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे, संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवून आपल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व्यवस्थेची आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची प्रभावी छाप उमटविली आहे. संस्थेच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना आणि कौशल्य विकासासाठी करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या यशामुळे अधिक बळ मिळाले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण विभागासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या नियंत्रणाखाली संस्थेचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे. या यशामध्ये संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले असल्याची भावना औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडीचे प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी व्यक्त केली.

मोरवाडी आयटीआयच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशिक्षणाची उत्कृष्टता आणि उद्योगाभिमुख कौशल्य विकास क्षेत्रातील विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित झाली असून भविष्यातही अधिक उंची गाठण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी सांगितले.

 

👉💬पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर मिळविलेले हे यश शहराच्या शैक्षणिक व कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक आहे. देशात ७ वा आणि राज्यात ५ वा क्रमांक मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे. कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, आत्मनिर्भर आणि उद्योगसज्ज युवक घडविण्याचे कार्य मोरवाडी आयटीआय प्रभावीपणे करत आहे. भविष्यातही संस्थेने उत्कृष्टतेची ही परंपरा कायम राखून आणखी उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका 

 

💬”मोरवाडी आयटीआयने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेला हा मान पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद आहे. सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट ग्रेडिंग प्राप्त करणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व्यवस्थेची आणि अधिकारी कर्मचारी यांच्या समर्पित कार्याची पावती आहे. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख व रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यातही संस्थेची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशाश्वत भविष्यासाठी ‘हरित शपथ’ अभियान
Next Article मनपा शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करा; नगरसेवक विश्वजीत बारणे यांची आयुक्तांकडे मागणी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?