Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»छत्रपती शिवाजी महाराज हे कालातीत व्यक्तिमत्त्व! – संदीप तापकीर     
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज हे कालातीत व्यक्तिमत्त्व! – संदीप तापकीर     

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प तिसरे

  • पिंपरी (हिंदवीन्यूज)–

‘अवघ्या पन्नास वर्षांची गतिमान कारकीर्द लाभलेले छत्रपती शिवाजीमहाराज हे दूरदृष्टी असलेले कालातीत व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच स्वराज्याचे पुढे साम्राज्यात रूपांतर झाले!’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले.  गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना संदीप तापकीर बोलत होते. इतिहास अभ्यासक ब. हि. चिंचवडे अध्यक्षस्थानी होते.  नगरसेविका मनीषा चिंचवडे, प्रभाकर महाजन आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होत

संदीप तापकीर पुढे म्हणाले की, ‘आपण आज जे स्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगतो, त्याचे मूळ छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्यात आहे. शहाजीराजे यांनी दोन वेळा स्वराज्याची उभारणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. त्यांच्या पराक्रमाची वर्णने ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथात नमूद केली आहेत. शिवाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब या दांपत्याचे आठवे पुत्र होते. बालपणापासून त्यांना राजा म्हणूनच घडविण्यात आले. बाल शिवबांचा इतिहास कवी परमानंद यांनी शब्दबद्ध केला आहे. १६४६ मध्ये शिवरायांच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला. दादोजी कोंडदेव हे कधीही शिवबांचे गुरू नव्हते. कोरिगड हा किल्ला त्यांनी पहिल्यांदा जिंकला. त्यानंतर रोहिडा आणि नंतर तोरणा जिंकला. त्यांनी वडिलांकडून किल्ल्यांचे महत्त्व आणि गनिमी कावा शिकला; तर आईकडून न्यायदानाची पद्धत शिकले. आयुष्यातील पहिली लढाई फत्तेखानाविरुद्ध लढून विजय मिळवला. मोगलांशी संधान साधून आदिलशहाकडून शहाजीराजे यांची कैदेतून सुटका करण्याची मुत्सद्देगिरी दाखवली. १९५६ मधील जावळीपर्व हे शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व होते. स्वराज्याची उभारणी करीत असताना एकाही डावपेचाची त्यांनी कधीही पुनरावृत्ती केली नाही. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या विरोधातील लढाईला मंत्रयुद्ध म्हटले जाते. त्यानंतर लगेचच २८ नोव्हेंबरला पन्हाळा ताब्यात घेतला. अतिशय कार्यक्षम गुप्तहेर खाते हा महाराजांच्या प्रत्येक विजयातील महत्त्वाचा घटक होता; तर उंबरखिंडीतील कारतलबखानाच्या विरोधातील यश हे गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. अठरापगड जातीच्या मावळ्यांना वेगवेगळी जबाबदारी सोपवून त्यांचा चतुराईने वापर केला; पण त्यांच्या हौतात्म्यानंतर महाराजांनी त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी पत्करली म्हणून त्यांच्यावर कधीही जातीयवादी असा आरोप केला जात नाही. आरमाराची राजधानी असलेला सिंधुदुर्ग बांधणाऱ्या शिवरायांच्या आयुष्यातील १६७० हे निर्णायक वर्ष होते. त्या एकाच वर्षात त्यांनी बत्तीस किल्ले जिंकले; आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. छत्रपती शिवाजीमहाराज आणि रामदासस्वामी यांची एकमेव भेट १६७२ मध्ये झाली होती; मात्र ते महाराजांचे गुरू नव्हते. महाराजांचे कर्तृत्व इतके अद्भुत आहे की, त्या इतिहासाचा अभ्यास न करता वक्तव्य करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. १६७४ पर्यंत त्यांच्या ताब्यात २४० किल्ले होते. ०६ जून १६७४ हा छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. त्यानंतरचा दक्षिण दिग्विजय हा प्रेरणादायी इतिहास आहे. ०३ एप्रिल १६८० या दिवशी त्यांचे निधन झाले तरी जोपर्यंत चंद्र – सूर्य आहेत, तोपर्यंत महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाचा इतिहास चिरकाल राहील. त्यानंतर छत्रपती संभाजीमहाराज यांनी शिवनीतीचा समर्थपणे अवलंब केल्याने स्वराज्याच्या विस्तारात मोठी भर पडली. संभाजीमहाराज यांचे बलिदान महाराष्ट्राने व्यर्थ जाऊ दिले नाही. राजाराममहाराज, ताराराणी यांच्या मुत्सद्दी युद्धनीतीमुळे स्वराज्य अबाधित राहिले. पेशवे आणि मराठी सरदारांनी पानिपताच्या संकटावर मात करून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करून ते भारतभर पोहोचवले!’ ओघवत्या शैलीतून संदीप तापकीर यांनी विषयाची विस्तृत मांडणी केली.

ब. हि. चिंचवडे यांनी मनोगत व्यक्त केले.  ‘इतिहास हा किचकट विषय असल्याने त्याची सत्यता अस्सल कागदपत्रांच्या आधारेच मांडता येते!’ असे मत व्यक्त केले.

ॲड. विपुल नेवाळे, महेश गावडे, बंडू भोकरे यांनी संयोजन केले. सूरज भोईर यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंतांच्या संगतीत सद्विचारांचा लाभ! – प्रा. डॉ. संजय चौधरी
Next Article अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे! – ॲड. नीलिमा गोखले
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?