Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
पिंपरी चिंचवड

पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेने कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या शहरामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक गुणी कलाकार आहेत.  या कलाकारांचे योगदान समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही किंवा त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळत नाही. अशा परिस्थितीत कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळते, तसेच युवा पिढीलाही कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले.

शहराच्या नावलौकिकात आपल्या कर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, शत्रुघ्न काटे, योगेश बहल, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

डॉ. नंदकिशोर कपोते पुढे म्हणाले, माझे संपूर्ण बालपण पिंपरी चिंचवडमध्येच गेले. येथील शाळांमध्ये शिक्षण घेत असताना माझ्यामध्ये कलेची आवड निर्माण झाली. विशेषतः नृत्यकलेबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज करण्यात आलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. ज्या शहरात माझे बालपण गेले, ज्या मातीत मी वाढलो, शिकलो आणि घडलो, त्या पिंपरी चिंचवड शहराकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी सर्वांत मोठा आणि मोलाचा आहे. यावेळी मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

 

🎭पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उंची देणारे कलासाधक

डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्यकलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची मूल्ये जपत पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील कथक या अभिजात, समृद्ध आणि तेजस्वी कलावैभवाला आपल्या अद्वितीय प्रतिभा, कठोर साधना आणि संस्कृतीनिष्ठ कार्यातून जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ज्येष्ठ कथक नर्तक, गुरु, संशोधक, लेखक, विचारवंत आणि संस्कृतीचे अभ्यासक म्हणून डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी भारतीय कला विश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले पुरुष कथक नर्तक म्हणून डॉ.कपोते यांनी मानाचे शिखर सर केले. कथक नृत्यकलेतील त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार या प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मानाने गौरवान्वित केले आहे. याशिवाय पुणे आणि निगडी येथे स्थापन केलेल्या नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या माध्यमातून डॉ.कपोते यांनी कथक नृत्याचे शिक्षण, संवर्धन आणि प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्या″त आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘रंगीत तालीम’ ज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यात्मक प्रवास! – राजन लाखे
Next Article मनपा सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करा, अन्यथा न्यायालयात दाद मागू – ॲड. असीम सरोदे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?