Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत नागरिकांच्या प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली कार्यान्वित
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत नागरिकांच्या प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली कार्यान्वित

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी (हिंदवी न्यूज),

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांना प्रवेश सुलभ करणे, भेटीची डिजिटल नोंद ठेवणे व कार्यालयीन सुरक्षा बळकट करणे या उद्देशाने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय, मुंबई येथे अभ्यागत व प्रवेश व्यवस्थापनासाठी असणाऱ्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली सुरू केली आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या महानगरपालिका कार्यालयात प्रवेशासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘स्वागतम ई-पास’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे खाते (लॉगिन) तयार करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक तसेच आधार क्रमांक यांची नोंद करावी लागेल. खाते तयार करण्याची प्रक्रिया एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक वेळी प्रवेशासाठी स्वतंत्र नोंदणी करता येईल. नोंदणी करताना तसेच पुढील प्रत्येक प्रवेशाच्या वेळी नागरिकांचा मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे प्रमाणित केला जाईल.

प्रवेश नोंदणी करताना नागरिकांनी किमान एक आणि कमाल तीन विभागांना भेट देण्याची विनंती नोंदवावी लागेल. नोंदणी करताना नागरिकांना ई-पास काढावयाच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांपर्यंतचे (शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून) उपलब्ध दिनांक दिसतील. त्यानुसार आवश्यक दिनांक व विभाग निवडणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर प्रवेशासाठी क्यूआर कोड डाउनलोड करता येईल. जर क्यूआर कोड तात्काळ डाउनलोड केला गेला नाही, तरीही तो नागरिकांच्या खात्यामध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहील. आगाऊ नोंदणी केल्यास क्यूआर कोड संबंधित प्रवेशाच्या दिवशीच डाउनलोड करता येईल. महानगरपालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांचा प्रवेश सुनिश्चित केला जाईल. ही प्रक्रिया काही सेकंदांमध्ये पूर्ण होत असल्याने प्रवेशद्वारावर गर्दी किंवा विलंब होणार नाही.

याशिवाय ज्या नागरिकांनी आगाऊ नोंदणी केलेली नाही किंवा खाते तयार केलेले नाही, त्यांनी प्रवेशद्वारावर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून तात्काळ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर प्रवेश देण्यात येईल. या प्रणालीमुळे नागरिकांना कमीत कमी वेळेत इमारतीमध्ये प्रवेश मिळणे तसेच प्रत्येक प्रवेशाची अचूक नोंद महानगरपालिकेकडे राहणे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे, असे देखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वागतम ई-पासबाबत नियमावली

नागरिकांनी संबंधित अधिकारी/विभागाशी पूर्वनियोजित भेट निश्चित करूनच स्वागतम ई-पाससाठी अर्ज करावा. सुरक्षा विभागाकडून प्रवेशद्वारावर स्वागतम ई-पासची पडताळणी केल्यानंतरच संबंधित व्यक्तीस प्रवेश देण्यात येईल. तसेच ई-पासमध्ये नमूद केलेल्या वेळ, दिनांक व उद्देशासाठीच प्रवेश वैध राहील.  नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी विभागांना भेटीची वेळ ही दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० अशी राहील.  अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०६/०४/२०२६ रोजीच्या परिपत्रकान्वये दर मंगळवार व गुरुवार दुपारी ४:०० ते सायंकाळी ६:०० ही वेळ निश्चित करण्यात आलेली असून, फक्त त्याच वेळेस नागरिकांना अधिकारी वर्गाला भेटता येईल.  सर्व उपोषण तथा आंदोलनासाठी आलेल्या शिष्टमंडळासाठी मुख्य प्रवेशद्वारावर हस्तलिखित प्रवेशपास दिला जाईल. सर्व शासकीय/निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्रावर प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र नसल्यास ऑनलाईन प्रवेश प्रणालीद्वारे प्रवेश पास काढावा लागेल.  कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी मनपा कार्यालयामध्ये विभागामार्फत आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या सर्व अभ्यागतांसाठी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेमध्ये प्रवेशासाठी संबंधित विभागाचे पत्र असणे आवश्यक आहे. सदर पत्रावर अभ्यागतांची नावे नमूद असणे आवश्यक आहे.  ई-पासचा गैरवापर, बनावट माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.

….

पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. नागरिकांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या प्रवेशाची नोंद असणे आवश्यक आहे. स्वागतम ई-पास प्रणालीमुळे नागरिक कोणत्या विभागाला किती वेळा भेट देतात, याची माहिती मिळणार असून त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्याची तयारी महापालिका प्रशासनास करणे सोपे होईल. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.

-डॉ. विजय सुर्यंवशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleछत्रपती संभाजी महाराज यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधन पर्व उपयुक्त – महापौर रवि लांडगे
Next Article अंगारकी चतुर्थी निमित्त चिंचवडचा राजा गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव व चंदन उटी’ सोहळा उत्साहात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?