Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»‘संविधान हत्या दिन’ : आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त दिघीत विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान
पिंपरी चिंचवड

‘संविधान हत्या दिन’ : आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त दिघीत विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(हिंदवी न्यूज)- २५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत.भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या त्या काळातील काँग्रेस पक्षाचा काळा इतिहास तरुण पिढीला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कळावा,या उद्देशाने दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ आणि ‘संविधान हत्या दिन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

दिघी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना शुभम खेडेकर म्हणाले की, “२५ जून १९७५ रोजी कोणताही सबळ कारण नसताना केवळ सत्तेसाठी आणि राजकीय फायद्याकरिता घटनेतील कलम ३५२ चा गैरवापर तत्कालीन सरकारने केला. तब्बल २१ महिने चाललेल्या या आणीबाणीत विरोधकांचा आवाज दाबला गेला आणि ‘मिसा’ कायद्याचा वापर करून जनतेवर अन्याय करण्यात आला. ही केवळ आणीबाणी नव्हती, तर ती संविधानाची हत्या होती. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा आदर करणे आणि त्याचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य मानले पाहिजे.”
या कार्यक्रमास हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आणीबाणीच्या भीषण वास्तवाविषयी माहिती जाणून घेतली आणि काही प्रश्नही विचारले. “संविधानाचे रक्षण आणि लोकशाहीचा आदर हीच आपली खरी ताकद आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास माहित असणे ही काळाची गरज आहे,” असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास आणीबाणी चे ५१ वे वर्ष या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे, जिल्हा सरचिटणीस विकास डोळस, या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उदय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, जिल्हा सहसंयोजक दिनेश यादव, उपाध्यक्ष संजय पटणी, कैलास सानप, रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक विनोद वाळके सर, नगरसेवक कृष्णाजी सुरकुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तापकीर, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष रमेश विरणक, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सुशांत पवार, ह्षिकेश भालेकर, अमित महाडिक, प्रमोद पठारे, दादासाहेब चितळे सर आणि अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद परदेशी यांनी केले, सूत्रसंचालन दादासाहेब चितळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक उदय गायकवाड यांनी मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव
Next Article पिंपरीत ‘संविधान हत्या दिन’निमित्त विशेष व्याख्यान: आणीबाणीच्या ५१ वर्षांनंतरही लोकशाही रक्षणाची शपथ
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026

‘मंगलगाणी – दंगलगाणी’ ने मराठी संस्कृतीला स्पर्श करीत रसिकांची जिंकली मने!

October 6, 2026

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘नियम आणि अटी लागू’ने रंगवला संसारातील नात्यांचा खेळ

October 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवडचे  पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी…

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026

मैसूर दसरा : परंपरा, इतिहास आणि वैभव – डॉ. शालिनी रजनीश, IAS. मुख्य सचिव, कर्नाटक.

October 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?