आळंदीत हरिनामाचा जयघोष ; ग्रंथ साहित्य संपदा वाटप
आळंदी ( हिंदवी न्यूज) : येथील श्री निकेतन गुरुकुल विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात करण्यात आला. यावेळी हरिनामाचा जयघोष करत ग्रंथ संपदा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी होते. या प्रसंगी ह.भ.प. विश्वकर्मा महाराज पांचाळ, श्री राम मंदिराचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, विश्वंभरभाऊ पाटील, कैलास आव्हाळे, माऊली जाधव, संस्थेचे शरद उपाध्ये, अंजली उपाध्ये, कविता उपाध्ये, डॉ. अश्विनी कुलकर्णी, मुख्याध्यापक मोहिनी भदाणे, पुनम शिरसाठ, समन्वयक स्नेहल कुंभार आदी उपस्थित होते.
हरिनामाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत, श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमा पूजन, मान्यवरांचा सत्कार व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कु. श्रावणी गव्हाणे हिने अभंग गायन सादर करीत रसिकांची मने जिंकली. या वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत मान्यवरांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.
“माऊली… माऊली…” च्या जयघोषात इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायिक कलेतील पाऊले याचे लयबद्ध सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केले मूल्यशिक्षण काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी गेल्या वर्षीचे उपक्रमाचा अनुभव कथन केला. ⁶संत साहित्य शिदोरी भेट स्वीकारत ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रम संस्थेने स्वीकारल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओळख श्री ज्ञानेश्वरी ची उपक्रम भाव भक्तीमय उत्साही वातावरणात हरिनाम जयघोष करीत प्रारंभ झाला. श्वेता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. रश्मी संभे यांनी प्रास्ताविक केले, पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
![]()
