पिंपरी,(हिंदवी न्यूज) ता. २ : रुग्ण हक्क परिषद पिंपरी-चिंचवड शहर, ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यसनमुक्त तरुणाई महासंकल्प सभा’ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे तसेच अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड उपस्थित राहणार आहेत. माजी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे हे प्रमुख वक्ते म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत.
तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करणे, व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प दृढ करणे आणि युवकांना सकारात्मक दिशा देणे, हा या महासंकल्प सभेचा उद्देश आहे. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण आणि नगरसेवक निखिल बोराडे यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
![]()
