Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»आळंदीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे नामजयघोषात प्रस्थान हजारो वारक-यांची उपस्थिती ; श्रींचे चलपादुका पालखीची मंदिर प्रदक्षिणा
पिंपरी चिंचवड

आळंदीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे नामजयघोषात प्रस्थान हजारो वारक-यांची उपस्थिती ; श्रींचे चलपादुका पालखीची मंदिर प्रदक्षिणा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments10 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पाहुणचारास सोहळा गांधी वाड्यात विसावला

हिंदवी न्यूज |आळंदी

वारकरी संप्रदायाचे प्रतीक गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा गजर करीत लाखो भावीकांचे उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात माउलींच्या पालखीचे प्रस्थान भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माउली मंदिरातील विना मंडपातून बुधवारी ( दि. ८ ) हरिनाम गजरात सायंकाळी सव्वा सहाचे सुमारास झाले.

प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी प्रयत्न केले. या साठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या मुळे मर्यादित वारकरी, भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान हरिनाम गजरात ठेवले. या वेळी आळंदीकर ग्रामस्थ युवक तरुणांनी श्रींची पालखी खांद्यावर  नाचवित माऊली माऊली जयघोष केला.

श्रींचे प्रस्थान प्रसंगी धर्मादाय सह आयुक्त दिनेश कोथळीकर, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रांत अनिल दौन्डे, पोलीस निरीक्षक भीमा नरके, माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील, डॉ. राम गावडे पाटील, उर्जितसिंह शितोळै सरकार, महादजी शितोळे सरकार, पालखी सोहळा प्रमुख अँड राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, रोहिणी पवार, बैल निवड समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, पालखी सोहळा मालक राजेंद्र बाळासाहेब आरफळकर, ऋषिकेश राजेंद्र आरफळकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ चोपदार, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, स्वप्नील कु-हाडे, फडकरी, दिंंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले. प्रस्थान दिनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य आळंदीतील श्रींचे पुजारी क्षेत्रोपाध्ये यांनी केले.

या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आळंदीतील पुलांचे कठडे महापुराचे पाण्यात वाहूंन गेले. आळंदीतील महापुराने नागरी सेवा सुविधा कोलमडल्या. पिण्याचे पाण्यापासून थेट निवाऱ्या पर्यंतच्या समस्यां निर्माण झाल्याने प्रशासनाने आळंदीकडे भाविक कसे येणार नाहीत या साठी यंत्रणा राबविली. तरीही आळंदीत लाखावर भाविकांची उपस्थिती शहर परिसरात प्रस्थांन साठी होती. श्रींचा प्रस्थान सोहळा मात्र मर्यादित भाविकांचे उपस्थितीत झाला. प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी प्रयत्न केले. झाल्याने प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वारकरी, भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले.

अलंकापुरीत प्रदीर्घ वेळे नंतर श्रींचे अश्व आळंदीत प्रवेशले ; परंपरांचे अखेर पालन

श्रींचे अश्व आळंदीत आणण्यास देखील प्रचंड विलंब लावला. या मुळे देखील अनेकांत नाराजी राहिली. आळंदी ग्रामस्थ पदाधिकारी माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, अश्व सेवा मानकरी मालक उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार यांनी आळंदी देवस्थांनशी संवाद ठेवत रात्री उशिरा मंगळवारी ( दि. ७ ) श्रींचे अश्व मंदिरात प्रवेशले. आळंदी देवस्थान तर्फे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, विश्वस्त रोहिणी पवार, योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम पाटील, चैतन्य लोंढे कबीरबुवा, व्यवस्थापक माउली वीर यांनी स्वागत करीत अश्व पूजा केली. त्या नंतर कारंजा मंडपातून श्रींचेअश्वानी दर्शन घेत मंदिर प्रदक्षिणा करीत मुक्काम स्थळी रात्री उशिरा पोहोचले. शितोळे सरकार आणि पालखी सोहळा मालक यांनी प्रथा परंपरांचे पालन करण्याची ठाम भूमिका घेत श्रद्धा जोपल्साल्या. अलीकडील काळात परंपरांना तडा लावण्याचे काम केले जात आहे. ते षडयंत्र मात्र या वर्षी धुळीस मिळवले गेले.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सेवेने गर्दी वर उपाय

आळंदी देवस्थानने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने लाखो भाविक, नागरिकांना सोहळा आपापल्या घरात राहून सुरक्षित पणे पाहता आला. आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेण्याची पर्वणी या मुळे नागरिक, भाविक यांना लाभली. मात्र दिंडीकरी आणि खांदेकरी यांचे मंदिर प्रवेशाचे संख्येवर नियंत्रण आणल्याने ग्रामस्थ आणि दिंडीतील वारकरी यांच्यात मोठी नाराजी राहिली. मंदिरात प्रवेश करण्याचे कारणावरून पोलीस आणि वारकरी यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. वारकरी यांनी सुरक्षा कठडे ओलांडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी किरकोळ वादंग झाले. माउली मंदिर परिसरातील रस्ते पोलीस प्रशासनाने भाविकांना येण्यास रोखल्याने भाविकांना थेट कळस व मंदिर प्रदक्षिणा करता आली नाही. येथील भागीरथी नाला मार्गावर अस्वच्छता, राडा रोडा आणि स्वच्छता प्रभावी नसल्याने भाविकांची गैरसोय झाली. नाल्यातून पाणी वाहिन्या ऐवजी नाल्यावरुन पाणी वाहिले जात असल्याने गैरसोयीच्या वाढ झाली. मंदिर परिसरातील राम घाट, दगडी दोन घाट, शनी मारुती मंदिर मार्ग, भागीरथी नाला मार्ग वापरावर मर्यादा आल्याने इतर मार्गावर भाविक आले. मात्र भाविकांना येथून देखील पुढे जाण्यास मर्यादा आणल्याने नाराजीचा वाढ झाली. मंदिर परिसरात प्रस्थान दिनी पोलिसानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आळंदी परिसरात होत असलेल्या पावसाने परिसरातील रस्ते आळंदीत येण्यास बंद ठेवण्यात आल्याने वारकरी दिंड्याची गैरसोय झाली. इंद्रायणी नदीचे पाणी नदीचे पाणलोट आणि लाभ क्षेत्रात वाढत असल्याने प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले. या मुळे अनेकांनी एस टी. स्टॅन्ड येथील निवारा शेडचा सहारा शोधला. तिथे पुरेशा प्रमाणात नागरी सेवा सुविधा देण्यात आल्या. संततधार पावसाचे सरीत प्रस्थान सोहळा उत्साही आनंददायी वातावरणात झाला.श्रींचे सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेख, श्रींचे संजीवन समाधी दर्शन, मंदिर स्वच्छता, प्रस्थान दिनी मंदिर परिसरात केलेली लक्षवेधी पुष्पसजावट भाविकांनी पहात सोहळा अनुभवाला. आळंदीतील नगरप्रदक्षिणा मार्गावर भाविकांच्या दिंड्यानी प्रदक्षिणा करीत सोहळ्यास हजेरी लावली. या वर्षी पालखी सोहळ्यातील पावसाने परिसरात मोठी तारांबळ उडाली मात्र अनेकांनी आपली सोहळ्यातील हजेरी लावत सेवा कायम रुजू करीत उपस्थिती ठेवली.                प्रस्थान सोहळ्याचे नियोजन या वर्षी थेट वरिष्ठांचे हस्तक्षेपात झाले. गर्दी वाढेल या शक्यतेने पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करीत स्थानिक नागरिकांना रहदारीला गैरसोय झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान पार पडले. प्रशासनास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त लावला. यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी प्रभावी नियोजन केले. मात्र काही वारकरी आणि स्वयंसेवक यांना सेवेच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाने गैरसोयीची वागणूक दिल्याने सेवकांमध्ये नाराजी राहिल्याचे नागरिकांनी सांगितले.

अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपार पर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.

दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. मंदिरात सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांचे माध्यमातून सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा प्रस्थानपूर्व स्वच्छ करण्यात आला. सेवाभावीवृत्तीने सेवकांनी आपली सेवा रुजू केली.

पालखी पायी वारी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. सोहळ्यास यावर्षी परंपरेने दुपारी सुरुवात झाली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांतील मर्यादित भाविकांना मंदिरातील देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरे प्रमाणे चोपदार यांचे सूचनां प्रमाणे प्रवेश देण्यात आला. यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील मर्यादित स्वरूपात प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ११ ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्यावर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर आळंदी देवस्थान तर्फे श्रींची आरती झाली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका पालखी प्रस्थानासाठी पुष्प सजावटीने सजलेल्या पालखी चौथ-या वर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राण प्रतिष्ठापना संस्थान तर्फे वेदमंत्र जयघोषात झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे चलपादुका देवस्थान तर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांचे कडे देण्यात आल्या. मालक आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींचे वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत विधिवत पूजा झाली. श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ यांनी माऊली माऊली असा नामजयघोष करीत खांद्यावर उचलीत वारीला जाण्यास वीणा मंडपातून पंढरी कडे हरिनाम गजरात प्रस्थान ठेवले. या वर्ष ठराविक मान्यवरांना दिंडीतुन प्रवेश देण्यात आला.

माऊलींचे पादुकां पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्या नंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा वैभवी सोहळा विसावला. आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे गुरुवारी  ( दि. ९ ) मार्गस्थ झाली. यावर्षी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराने पालखीचा पुण्यनगरीकडे जाण्याचा मार्ग बदलण्यात येत आहे. चऱ्होली खुर्द मार्गे सोहळा पुढे मार्गस्थ होणार असल्याचे देवस्थानने जाहीर केले आहे.

पायी वारी असल्याने मर्यादित स्वरूपाची भाविकांची सोहळ्यास उपस्थिती राहिली. आळंदी देवस्थान ने श्रींचे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरी राहून लाखो नागरिकांना सोहळा पाहता आला. यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा हरिनाम जय घोषात झाली. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट लक्षवेधी होती. नदी घाटावर देहू आळंदी विकास समितीचे वतीने या वर्षी कोणतेही लोकशिक्षणपर कार्यक्रम झाले नाहीत. थेट प्रक्षेपण असल्याने नागरिकांनी घरात राहून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटने भाविकांची दाद घेतली.

या वर्षीआळंदीतून पालखी चऱ्होली खुर्द मार्गे पुण्याकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलण्यात आला असल्याचे आळंदी देवस्थान ने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना काळवीट चऱ्होली खुर्द रस्त्याचे देखभाल दुरुस्तीची मागणी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान नंतर पहिला मुक्काम आळंदी येथील आजोळतर गांधी वाड्यातील दर्शन बारी येथे झाल्यावर गुरुवारी ( दि.९ )  पुण्यनगरीकडे हरिनाम गजरात निघेल. आळंदीतील दोन्ही पुलां वरून पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. मात्र पुलांची परिस्थिती चांगली नसल्याचे देवस्थानने सांगितले आहे. त्यामुळे माऊलींच्या पालखीचा मार्ग बदलण्याचा निर्णय आळंदी देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. या वर्षी नवीन मार्ग आळंदी येथून चऱ्होली खुर्द ते दाभाडे सरकार चौक या मार्गाने पुढे चऱ्होली बुद्रुक मार्गे चऱ्होली फाटा आणि पुढे आळंदी पुणे मार्गाने पालखी सोहळ्याचे पायी वारी प्रवास होईल. असे देवस्थाने निर्णय घेत कळविले. दाभाडे सरकार चौक आणि चऱ्होली खुर्द येथील पुलाच्या दोन्ही बाजूचे खड्डे बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना सूचना देत देवस्थानने मागणी केली आहे. तिथे प्रत्यक्ष भेट देऊन काम लवकर पूर्ण करण्यासह पालखी साठी रस्त्याची रुंदी वाढविण्यास आळंदी देवस्थानने मागणी केली असल्याचे पत्र पुणे जिल्हाधिकारी यांना दिले .

आळंदीत प्रस्थान सोहळ्या येता न आल्याची भाविकांची खंत प्रस्थान दिनी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहता न आल्याने अनेक भाविकांनी खंत व्यक्त केली. मात्र पुण्यापासून पुढे सोहळ्यात सहभागी होऊन आनंदवारी अनुभवणार असल्याचे सांगितले.

पब्लिक अड्डरेस सिस्टीम प्रभावी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्या अंतर्गत पायी वारी पूर्व नियोजनासाठी तसेच भाविक नागरिकांना सेवा सुविधांची माहिती देण्यात सोहळ्यात आळंदी पोलीस विभागाचे वतीने पब्लिक अड्डरेस सिस्टीम प्रभावी राबविण्यात आली. भाविक, नागरिकांच्या तसेच मंदिर व परिसरात आरोग्य आणि सुरक्षिततेस प्राधान्य देत भाविकांना सूचना आणि मार्गदर्शन केले जात होते. यासाठी आळंदी देवस्थान, आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय, पुणे जिल्हा परिषद आरोग्य सेवा, महसूल प्रशासन आणि वीज महावितरण यांनी कंबर कसली. भाविकांसह नागरिकांना प्रस्थान सोहळा काळात नागरी सेवा सुविधांस नियोजन पूर्व आढावा बैठकीत दिलेल्या सूचना आदेशा प्रमाणे प्रशासनाने कामकाज करीत सेवा रुजू केल्या आहेत. आळंदीकर ग्रामस्थ यांनी श्रींचे पालखीला खांदा देत श्रींची पालखी हरिनाम गजरात हरिनाम गजरात वाहिली.

या वर्षी चे प्रस्थान दिनी नियोजनाचा प्रचंड अभाव राहिला. अतिशय चुकीचे नियोजन होते. भाविकांना मंदिराच्या आसपास ही फिरकू देण्यात आले नाही. बाहेरून प्रदक्षिणा करून दिली नाही. या वर्षी पावसाचे कारणाने भाविकांची संख्या मंदिरात फारच कमी राहिली. पोलीस यंत्रणा, मंदिर प्रसाशन, नगरपरिषद यांचा मध्ये सुसंवाद ताळ मेळ तसेच देवस्थानचे विश्वस्त यांच्यात एक वाक्यता नव्हती असे अनेक जाणकारांनी सांगितले. इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे कारण दाखवून फारच हलगर्जी पणाअनेक कामांत दिसून आल्याचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांचेसह अनेक भाविक, नागरिकांनी सांगितले. अनेक भाविक बाहेर गावाहून आळंदीत श्रींचा वैभवी पालखी सोहळा पाहण्यास येथे येत असतात. त्या सर्व भाविकांची घोर निराशा झाली. प्रत्येकाला पोलिसानी विनाकारण अडविले. अनेक ठिकाणाहून भाविकांना मंदिराकडे कलश दर्शनास देखील येऊ दिले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत गाव कारभारी, देवस्थानचे कारभारी यांनी दोष देत असल्याचे दिसले.  इंद्रायणी नदीचा पूर कमी झाला असून देखील आळंदीत प्रवेश करण्यास भाविकांना रोखण्यात आले. आळंदीतील चारही पुला खालून आता पाणी वाहत आहे. मात्र तरी देखील पोलिसां कडून स्थानिक नागरिक व वारकऱ्यांची अडवणूक झाली. आळंदीत सोडण्यास मनाई केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

महिलांसह पुरुषांनी फूगड्या खेळत समानतेचा संदेश देत प्रस्थान सोहळ्यातील वारीत पावले खेळली. अश्वांचे माऊली मंदिरात सव्वा चारचे सुमारास आगमन झाले.

 

Loading

Post Views: 35
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू
Next Article आळंदीतून आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्यास पाहुणचारासह निरोप
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?