Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»पीएमआरडीए’चे ‘जीआयएस’ पोर्टल सज्ज; नियोजनविषयक सर्व माहिती आता एका ‘क्लिक’वर!
पुणे

पीएमआरडीए’चे ‘जीआयएस’ पोर्टल सज्ज; नियोजनविषयक सर्व माहिती आता एका ‘क्लिक’वर!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– रिंगरोड, मेट्रो मार्ग, पूररेषा ते गावहद्दीची माहिती घरबसल्या उपलब्ध.

– नागरिकांचे कार्यालयातील हेलपाटे थांबणार!

हिंदवी न्यूज | पुणे 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिक, गुंतवणूकदार, विकासक, वास्तुविशारद, अभियंते आणि विविध शासकीय विभागांना नियोजनविषयक माहिती सुलभ, पारदर्शक व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) आधारित सार्वजनिक पोर्टल विकसित केले आहे. या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना प्रादेशिक नियोजनाची सर्व प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी आणि घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

या सार्वजनिक ‘जीआयएस’ पोर्टलवर ‘पीएमआरडीए’ कार्यक्षेत्राची सीमा, मंजूर प्रादेशिक योजना (आरपी), प्रस्तावित नगररचना योजना (टीपी स्कीम), गावहद्द तसेच महानगरपालिका व नगरपरिषदांच्या सीमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच एमएसआरडीसी व पीएमआरडीए रिंग रोड, पुणे मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्गीकृत रस्ते आणि मेट्रो स्थानकांभोवतीचे टीओडी (ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) झोन या पायाभूत सुविधांच्या लेअर्सचाही समावेश आहे. पर्यावरण व सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाच्या पूर लाल व निळ्या रेषा, वन्यजीव अभयारण्य, हिल स्टेशन व टाउनशिपच्या सीमा तसेच एनडीए, एचईएमआरएल, एमएडीसी (पुरंदर विमानतळ) आणि इतर संरक्षण विभागांचे बफर झोन यांची माहितीही या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या पोर्टलमुळे भूखंड किंवा मालमत्तेच्या परिसरातील नियोजनाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना ‘पीएमआरडीए’ कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता उरणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि शासकीय पाठपुराव्याचा ताण कमी होणार आहे. तसेच, विकासक, वास्तुविशारद व अभियंत्यांना विकास प्रस्ताव तयार करताना आवश्यक असणारी अधिकृत प्राथमिक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नियोजन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढून विविध शासकीय विभागांमधील माहितीचा समन्वय सुधारण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देणे आणि शाश्वत विकासासाठी माहितीआधारित निर्णय घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

“‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रातील नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे जीआयएस आधारित सार्वजनिक पोर्टल अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना आता त्यांच्या भूखंडाच्या परिसरातील रस्ते, पूररेषा, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक नियोजनाची अधिकृत प्राथमिक माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि ‘पीएमआरडीए’ कार्यालयाच्या फेऱ्याही कमी होतील. ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देत पारदर्शक व सुलभ प्रशासन देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ कटिबद्ध आहे.”

— *डॉ. अभिजीत चौधरी,* महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Pmrda gsi portal launch
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवकिलांना मारहाण प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन पोंधे यांचे अखेर निलंबन
Next Article मराठी पत्रकार संघाचा पिंपरी-चिंचवड व जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण समारंभ संपन्न
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा; शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार!- बाळासाहेब गोतारणे

October 7, 2026

चाकणपाठोपाठ थेऊर येथेही ‘पीएमआरडीए’ उभारणार घनकचरा प्रकल्प; १४ गावांतील कचराकोंडी फुटणार!

October 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?