हिंदवी न्यूज | पुणे
अॅड. साहिल दिलावर शेख यांना केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पुणे बार असोसिएशनकडून जाहीर निषेध करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
पोलीस उपायुक्त क्रमांक सात अबिनाश कुमार यांची पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड. राम भुजबळ साहेब, उपाध्यक्ष अॅड. कांताराम नप्ते पाटील, अॅड. प्रतापराव मोरे, सचिव अॅड. सम्राट जांभुळकर, अॅड. अभिजीत पोळ, अॅड. नेहा जांभळे, खजिनदार अॅड. अंजली बांदल, ऑडिटर अॅड. पूजा पवार, ऑडिटर अॅड. शिवराज निंबाळकर, सदस्य अॅड. उमेश मांजरे , अॅड. योगेश जैन, अॅड. स्मिता वाघमारे, अॅड. गुंजन भोसले तसेच शिरूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विकास फडतरे तसेच मा. सचिव अॅड. राहुल कदम समवेत पुणे जिल्ह्यातील तमाम वकील बंधू भगिनी यांनी भेट घेतली.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच नितीन पोंधे यांच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे वकिलांमधे समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यकाळामध्ये वकील बांधवांवर अशा प्रकारचे हल्ले झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पुणे बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.


