Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»सूर्यदत्तमध्ये सिद्धी जोहरींचा विद्यार्थ्यांना संदेश – “स्मार्ट दिसण्याबरोबरच स्मार्ट विचार करा!”
पुणे

सूर्यदत्तमध्ये सिद्धी जोहरींचा विद्यार्थ्यांना संदेश – “स्मार्ट दिसण्याबरोबरच स्मार्ट विचार करा!”

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 11, 2026Updated:August 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये सिद्धी जोहरींचे प्रेरणादायी भाषण;

विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि यशाचा संदेश

हिंदवी न्यूज | पुणे

विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आत्मविश्वास, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी देण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनमध्ये विविध प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासपर उपक्रम सातत्याने राबविले जातात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टीतून आणि उपाध्यक्षा व सचिव सौ. सुषमा एस. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि जीवनमूल्यांची जोड दिली जाते.

याच उद्देशाच्या अनुषंगाने सूर्यदत्तच्या बावधन परिसरातील बन्सीरत्न सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमात ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’, ‘फेस ऑफ इंडिया’, वैद्यकीय जैव रसायन शास्त्रज्ञ, महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय राजदूत, ‘नारी’च्या सह संस्थापक तसेच ‘नेचर वेल्फेअर कौन्सिल ऑफ इंडिया’च्या केंद्रीय संचालिका सौ. सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित मान्यवरांशी मनमोकळा  संवाद साधला.
“स्मार्ट दिसण्याबरोबरच स्मार्ट विचार करा!” असा संदेश देत सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. आपल्या
जीवनातील संघर्ष, अनुभव आणि यशस्वी वाटचालीतील विविध टप्पे सांगताना त्यांनी शिक्षण आणि ज्ञानासोबत आत्मविश्वास, सकारात्मक विचार, संवेदनशीलता आणि सामाजिक भान विकसित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रभावी संवादकौशल्य, जबाबदार नागरिकत्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची अंगे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही; सकारात्मक दृष्टिकोन, चांगले व्यक्तिमत्त्व आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तितकीच महत्त्वाची आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून ध्येय निश्चित करावे, अडचणींमधून शिकत पुढे जावे आणि स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सौ. अश्विनी देशपांडे यांनी सौ. सिद्धी जोहरी यांचा परिचय करून देत त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाचा गौरव केला. त्यानंतर प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सौ. सुषमा एस. चोरडिया यांच्या हस्ते सौ. सिद्धी जोहरी यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सूर्यदत्त समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सिद्धी जोहरी यांच्यासारख्या यशस्वी, कर्तृत्ववान आणि नेतृत्वगुणांनी समृद्ध महिला आजच्या युवा पिढीसाठी, विशेषतः तरुण विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील यशाबरोबरच महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सूर्यदत्तच्या व्यासपीठावर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असून, त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मूल्याधिष्ठित जीवन आणि यशाची नवी दिशा मिळेल.”
विद्यार्थ्यांच्या यशाच्या प्रवासात पालक, शिक्षक आणि कुटुंबाच्या पाठबळाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःची ध्येये निश्चित करून ती साध्य करण्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. भाषणानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. सिद्धी जोहरी यांनी प्रत्येक प्रश्नाला समर्पक, व्यावहारिक आणि प्रेरणादायी उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील विविध पैलूंकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. सूर्यदत्त समूहात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही सातत्याने भर दिला जातो. गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणाबरोबर संवादकौशल्य, नेतृत्वगुण, उद्योगाभिमुख कौशल्ये, सामाजिक भान आणि जीवन कौशल्ये विकसित करणारे विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणातून सक्षम व संवेदनशील व्यक्तिमत्त्व घडविणे, तसेच विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांसाठी तयार करणे, हा या उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

सिद्धी जोहरी यांचे कर्तृत्व म्हणजे आजच्या युथ आणि महिलांसाठी रिअल-लाइफ
इन्स्पिरेशन! त्यांच्यासारख्या अष्टपैलू मार्गदर्शकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स,
सोशल अवेअरनेस आणि लीडरशिपची नवी ऊर्जा निर्माण होत आहे.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

siddhi johar addressing students in suryadatta institute pune
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर! सोशल मीडियाच्या वापराचा पंतप्रधानांचा खासदार श्रीरंग बारणे यांना सल्ला
Next Article सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड  मास कम्युनिकेशनला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

August 22, 2026

चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

August 21, 2026

कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?