Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे
पुणे

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

‘इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग’ (IIAE) च्या शैक्षणिक सत्राच्या अभ्यासक्रमाचा शुभारंभ

हिंदवी न्यूज | पुणे

एव्हिएशन क्षेत्र हे आजच्या गतिमान युगात अत्यंत वेगाने प्रगती करणारे आणि भविष्यात देशाला आर्थिक व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वोच्च स्थानी नेणारे क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर नव्हे, तर एव्हिएशन सारख्या जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, असा मोलाचा सल्ला पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

एव्हिएशन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हडपसर, मांजरी येथील ‘इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग’ (IIAE) या नामांकित संस्थेमध्ये २०२६-२७ या नव्या शैक्षणिक सत्राचा आणि अभ्यासक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लावली, त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेचे फाउंडर डायरेक्टर श्री. एफ. एस. गिरी आणि संचालक श्री. नरेंद्र एफ. गिरी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, सभापती अभिषेक बारणे यांनी विमान वाहतूक आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अमर्याद संधींवर प्रकाश टाकला. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगसारख्या उच्च दर्जाच्या संस्थेत प्रवेश मिळणे हा विद्यार्थ्यांच्या करिअरचा सुवर्णकाळ आहे. येथे मिळणारे प्रात्यक्षिक ज्ञान आणि शिस्त ही भावी यशाची पायाभरणी ठरेल.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसर हा नेहमीच औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीमध्ये अग्रेसर राहिला आहे. अशा प्रगतशील वातावरणात विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. इंदिरा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे जागतिक दर्जाचे शिक्षण देशाच्या एरोस्पेस उद्योगाला नक्कीच नवी दिशा देईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पहिल्याच दिवशी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे थेट मार्गदर्शन लाभल्यामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास संचारला. विमान देखभाल अभियांत्रिकी (AME) क्षेत्रातील तांत्रिक आव्हानांना कसे सामोरे जावे, याबाबत मिळालेली माहिती अत्यंत मार्गदर्शक ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगने मागील १६ वर्षांत विमान वाहतूक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) मान्य अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांना १५ हून अधिक नामांकित MROs आणि एअरलाइन्समध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग व प्लेसमेंटची संधी मिळते. पहिल्याच दिवसाच्या या शानदार शुभारंभाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला असून ते विमान वाहतूक व एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग' (IIAE)
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘वननेस वन’ उपक्रमातून संत निरंकारी मिशनचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
Next Article प्रभागातील नागरी समस्या तातडीने सोडवा : सभापती अभिषेक बारणे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा; शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार!- बाळासाहेब गोतारणे

October 7, 2026

चाकणपाठोपाठ थेऊर येथेही ‘पीएमआरडीए’ उभारणार घनकचरा प्रकल्प; १४ गावांतील कचराकोंडी फुटणार!

October 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?