Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या वतीने साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या वतीने साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह

३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 1, 2026No Comments8 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल

हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६: अभिजात मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठीचे संवर्धन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तसेच ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यामध्ये साहित्यिक चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, अभिवाचन यातून मराठीचे अंतरंग उलगडले जाणार आहेत. तर नाटक, सांगितिक कार्यक्रम, एकांकिका, लोककला, लावणी, गझल असा वैविध्यपुर्ण कार्यक्रमांतून अभिजात मराठीचा जागर केला जाणार आहे. या महाउत्सवाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान देखील केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन मराठी भाषा संवर्धनाची लोकचळवळ अधिक गतीमान करावी असे आवाहन देखील डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, सांगवी येथील निळु फूले नाट्यगृह, चिखली येथील चिखली टाऊनहॉल आणि आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असणार आहेत.

 

*प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड*

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सनई, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता वैशाली पळसुले आणि सहकाऱ्यांचा ‘गणेश वंदना, कथक व लावणीची जुगलबंदी’ हा कार्यक्रम, सकाळी अकरा वाजता मोरया थिएटर्सचा ‘अंतर्नाद – अ जर्नी टू दी सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार सादर होणार आहे. सायंकाळी तीन वाजता सुप्रसिद्ध संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार असून, सायंकाळी चार वाजता ‘गाणी मंगेशकरांची’ हा त्यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता अशोक हांडे प्रस्तुत ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या संगीतमय रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता अथर्व थिएटर, चिंचवड यांची ‘भिरभिर’ ही एकांकिका, सकाळी दहा वाजता अस्मिता युवा मंच, पुणे यांची ‘इन दि नेम ऑफ’ ही एकांकिका सादर होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’ हे नाटक, सायंकाळी पाच वाजता धनंजय म्हसकर, अमोल बावडेकर, योगिता गोडबोले, प्रिती निमकर आणि अनघा पेंडसे यांच्या सहभागातून ‘धरित्रीच्या लेकी’ हा कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’ या महाराष्ट्राच्या लोककलेच्या भव्य सोहळ्याचे सादरीकरण होणार आहे. सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता राविरा एंटरटेनमेंटची ‘नंतर कधीतरी’ ही एकांकिका सुबोध जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणार आहे. दुपारी बारा वाजता संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सागर कारंडे, शलाका पवार आणि सायली देशमुख भूमिका साकारणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता सचिन खेडेकर अभिनीत आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ हे नाटक, तर रात्री साडेनऊ वाजता लोकजागर ऍक्टिव्हिटीजचा सणांवर आधारित संगीत-नृत्यमय कार्यक्रम ‘सणयात्रा’ सादर होणार आहे. मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मॉडर्न थिएटर, निगडीची ‘सोळाशे पन्नास’ ही एकांकिका, सकाळी दहा वाजता नाट्यसत्ताक संस्था, पुणे यांची ‘कॉर्पोरेट कबुतर’ ही एकांकिका सादर होणार आहे. दुपारी बारा वाजता मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री यांच्या सहभागातून देवेंद्र पेम यांचे ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक, सायंकाळी साडेपाच वाजता विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधूवर’ हे नाटक सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सूरज परसनीस यांच्या अभिनयातून सादर होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता मानसी-अंजन प्रस्तुत ‘सूर वेली’ हा सांगीतिक प्रवास रंगणार आहे. बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता ६५ कलाकार आणि २५ नृत्यांगनांच्या संचासह ‘फोक लावणी’ हा विशेष कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी प्रवेश केवळ महिलांसाठी असेल. सायंकाळी साडेपाच वाजता भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ हे विनोदी नाटक, तर रात्री साडेनऊ वाजता स्वराली एंटरप्रायजेस प्रस्तुत दिग्गज गायकांचा ‘स्वर मराठी मनाचा’ हा स्वरमयी प्रवास सादर होणार आहे. गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विजय पटवर्धन लिखित ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे बालनाट्य होणार आहे. दुपारी बारा वाजता डॉ. आशिष मुजूमदार, अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांचा ‘गजल आख्यान’ हा कार्यक्रम, दुपारी साडेतीन वाजता रिदम रूट्स प्रस्तुत दख्खनच्या लोककलांचा ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता कवी वैभव जोशी यांच्या स्वरचित कविता-गझलांचा ‘द मनमौजी’ हा कार्यक्रम, तर रात्री साडेनऊ वाजता मैत्र प्रस्तुत मराठी संगीताचे विविध पैलू उलगडणारा ‘म…मराठीचा’ हा सांगीतिक सोहळा रंगणार आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्लोबल थिएटर, आकुर्डी यांची ‘मुक्ताक्षरे’ ही एकांकिका, दुपारी बारा वाजता डॉ. गणेश शिंदे आणि सन्मिता धापटे-शिंदे यांचा वैचारिक व भक्तीमय ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता बक्षीस वितरण व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप समारंभ होणार असून, सायंकाळी साडेपाच वाजता नारायण सुमंत, प्रभाकर साळेगांवकर, प्रकाश घोडके, दिवाकर जोशी, हनुमंत सोनवणे, संध्या फुलपगार आणि सुप्रिया हळवे यांच्या सहभागातून निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रात्री नऊ वाजता ‘अविनाश – विश्वजित संगीत रजनी’ या सुपरहिट चित्रपट संगीतकारांच्या सांगीतिक कार्यक्रमाने या रंगमंचावरील कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

 

माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या छायाचित्रांचे विशेष प्रदर्शनाचे आयोजन*

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक घडामोडींचे चित्ररूप दस्तऐवजीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या नजरेतून टिपलेले विविध पैलू या प्रदर्शनातून रसिकांना अनुभवता येणार आहेत. हे प्रदर्शन दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथील कला दालनात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

*चिखली टाऊन हॉल, चिखली*

चिखली टाऊन हॉल येथे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीझीच्या गुहेत चिंटुची धमाल’ हे बालनाट्य, तर सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वर मेश्राम, कल्याणी देशपांडे आणि सहकाऱ्यांचा अभंग व भक्तीगीतांचा ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम होणार आहे.

*नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी*

नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी येथे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता ‘अंतर्नाद – अ जर्नी टू दी सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार, तर सायंकाळी साडेसहा वाजता चंद्रकांत शिंदे, संकल्प गोळे आणि राजेश्वरी पवार यांचा ‘रंग भक्तीचे.. सूर लोकगीताचे’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे जादुई बालनाट्य, सायंकाळी पाच वाजता अभिजित कोसंबी, धवल चांदोडकर आणि कविता राम यांचा ‘सदाबहार अजय – अतुल’ हा सांगीतिक कार्यक्रम, तर रात्री नऊ वाजता मंजुश्री दिवाण आणि सहकाऱ्यांचा शांताबाई शेळके यांच्या कवितांवर आधारित ‘स्वर – शांता’ हा कार्यक्रम होणार आहे. बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता माया खुटेगांवकर, संगीता लाखे आणि सहकाऱ्यांचा ‘लावण्यरंग’ हा ठसकेबाज लावणी कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी प्रवेश केवळ महिलांसाठी असेल. सायंकाळी पाच वाजता अशोक गायकवाड आणि स्वाती केसकर यांचा मराठी गझल व भावगीतांचा ‘गझलभाव’ हा कार्यक्रम, तर रात्री आठ वाजता स्वप्नील जोशी आणि विदुला चौगुले अभिनीत ‘लग्नपंचमी’ हे मराठी नाटक सादर होणार आहे. गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त ‘कथा वंगभंगाची’ हे नाटक, तर सायंकाळी पाच वाजता महिला वाद्यवृंदाचा ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता संजय नार्वेकर, सुनील तावडे आणि सहकाऱ्यांचे ‘भ्रमाचा भोपळा’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

*आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी*

आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अभिवाचन, दुपारी बारा वाजता ‘अभिजात मराठी भाषेचा प्रवास’ या विषयावरील परिसंवाद, दुपारी तीन वाजता कथाकथन, सायंकाळी पाच वाजता गझल मुशायरा आणि सायंकाळी सात वाजता गझलगायक अनिरुद्ध यादव यांचे गझलगायन आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भारती न्यायाधीश यांचा बालगीतांचा कार्यक्रम, सकाळी नऊ वाजता ‘ग्रीझीच्या गुहेत चिंटुची धमाल’ हे बालनाट्य, दुपारी बारा वाजता सुधीर फडके अर्थात बाबूजी ते अजय-अतुल यांच्या सांगीतिक प्रवासावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम आणि सायंकाळी पाच वाजता ‘कवन – अक्षर अक्षर तुझेच आहे’ ही कवितांची मैफिल होणार आहे. बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक कवींच्या सहभागातून स्थानिक कवींचे कवी संमेलन, दुपारी साडेबारा वाजता स्थानिक कलाकारांचा ‘गंध मराठी कलेचा’ हा कार्यक्रम, दुपारी तीन वाजता ‘मराठी साहित्याचे विश्व’ या विषयावरील चर्चासत्र आणि सायंकाळी साडेपाच वाजता शाहिर प्रकाश ढवळे आणि सहकाऱ्यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

*ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी*

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी छोट्या सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून महापालिका शाळांअंतर्गत समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी मोठ्या सभागृहात सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा भव्य लोककला सोहळा ‘मी मराठी’ सादर होणार आहे.

 

“मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे. हा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यामागची साहित्यिक परंपरा, लोककला, संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध विश्वाचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या मायबोलीच्या अभिजात वैभवाचा उत्सव साजरा करावा.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका वर्षभर विविध उपक्रम राबवित असते. अभिजात मराठी भाषा सप्ताह हा या उपक्रमातील मानबिंदू असून नागरी सहभागातून मायबोली मराठीचा प्रचार प्रसार अधिक दृढ होईल असा विश्वास आहे. तरी नागरिकांनी महापालिकेने राबविलेल्या अशा सर्व उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे. 

– विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Abhijat marathi bhasha sanman din
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदिवेआगर समुद्रात बुडून आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
Next Article पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली! ६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल. ६६.४७ टक्के नागरिकांनी भरला कर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?