Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ ने रसिकांना केले अंतर्मुख!
पिंपरी चिंचवड

मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ ने रसिकांना केले अंतर्मुख!

महापालिकेच्या ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’तील कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

संतवाणीतील भक्तिभावापासून ते पोवाड्याच्या जोशापर्यंत, लावणीच्या ठेक्यापासून ते भारूडाच्या सामाजिक आशयापर्यंत आणि ओव्यांच्या भावविश्वापासून पंढरीच्या विठ्ठलापर्यंतचा सुरेल प्रवास ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या नाट्य-संगीतमय आविष्कारातून रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेला.

अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ तसेच ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मोरया थिएटर्सच्या वतीने ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार सादर करण्यात आला. मराठी संत परंपरा, लोकसंगीत, भक्तिरस आणि महाराष्ट्राच्या लोकजीवनातील विविध रंगांची सुरेल गुंफण या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात ‘विठ्ठल माझा मला पावलं का…’ या गीताने झाली. त्यानंतर ‘पालखी सोहळा’, गवळण, ‘पोवाडा’, ‘दिंडीचे वर्णन सांगणारे गीत’, ‘गोंधळ’ अशा विविध सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. पुढे रॅप, लावणी, पिंगळा, रिंगण, भारूड अशा विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून मराठीच्या विविध बोली, लोकपरंपरा आणि समृद्ध संगीतविश्वाचे दर्शन घडले.

संतपरंपरेतील भक्तिरस, लोककलेतील उत्स्फूर्तता आणि मराठी मातीतील सांस्कृतिक वैविध्य यांचा सुरेल संगम या आविष्कारातून साधण्यात आला. शब्दांना सूर, सुरांना भाव आणि भावनांना लोकसंस्कृतीची समृद्ध किनार लाभल्याने ‘अंतर्नाद’ हा अभिजात मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव देणारा ठरला.

या निमित्ताने मराठी संस्कृतीतील विविध लोककला आणि संगीतप्रकारांची बहारदार अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. उपस्थित रसिकांनी या नाट्य-संगीतमय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभिजात मराठी भाषेच्या जागरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पारंपरिक वाद्यांच्या निनादात मराठी संस्कृतीचा जागर; तरुणाईने धरला ताल !

सनई, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी सकाळपासूनच परिसरात मराठी संस्कृतीचा जागर अनुभवायला मिळाला. ताशाकिंग सिराजभाई यांच्या ताशा वादनाने वातावरणात उत्साह निर्माण झाला. त्यानंतर पारंपरिक गीतांवर संबळ वादन करण्यात आले. तसेच हलगी वादनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जोश आणि उत्स्फूर्ततेचे दर्शन घडले. पारंपरिक वाद्यांच्या ताल-सुरांनी अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या शुभारंभाला लोककलेचा अनोखा रंग लाभला.

यावेळी बँड पथकाने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करणाऱ्या गीताचे उत्साहपूर्ण सादरीकरण केले. ताशा, संबळ, हलगी आणि बँडच्या तालावर परिसरातील वातावरण भारावून गेले. मराठी भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा करणाऱ्या या उपक्रमात तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ताल धरत जल्लोष केला. पारंपरिक लोकवाद्यांच्या निनादाने आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’च्या सुरांनी उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या शुभारंभाचा आनंद द्विगुणित केला.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमांना ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद!

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील सर्व आसने भरून गेल्याने कार्यक्रमाला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभला. मराठी भाषा, साहित्य, लोककला आणि संस्कृतीशी जोडलेल्या सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा रसिकांनी आनंद घेतला. टाळ्यांच्या कडकडाटाने कलाकारांचा उत्साह वाढवला.

*रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणारे कार्यक्रम*

सकाळी ९ वाजता : अथर्व थिएटर, चिंचवड यांची ‘भिरभिर’ ही एकांकिका,

सकाळी १० वाजता : अस्मिता युवा मंच, पुणे यांची ‘इन दि नेम ऑफ’ ही एकांकिका

दुपारी १२.३० वाजता : संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’ हे नाटक

सायंकाळी ५ वाजता : ‘धरित्रीच्या लेकी’

रात्री ९.३० वाजता : ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’ या महाराष्ट्राच्या लोककलेच्या भव्य सोहळा

सर्वांसाठी मोफत प्रवेश

Antarnad a journey to soul
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या स्वरदा यादव चा मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक
Next Article ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026

‘मंगलगाणी – दंगलगाणी’ ने मराठी संस्कृतीला स्पर्श करीत रसिकांची जिंकली मने!

October 6, 2026

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘नियम आणि अटी लागू’ने रंगवला संसारातील नात्यांचा खेळ

October 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवडचे  पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी…

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026

मैसूर दसरा : परंपरा, इतिहास आणि वैभव – डॉ. शालिनी रजनीश, IAS. मुख्य सचिव, कर्नाटक.

October 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?