हिंदवी न्यूज | आळंदी
राष्ट्रीय उत्तर भारतीय संघ व जगद्गुरु स्वामी शंकराचार्य समिती आळंदी देवाची, पुणे यांच्या वतीने उत्तर भारतातील सर्वात मोठा सूर्यदेवतेचा उत्सव असलेल्या छठ महापर्वचे भव्य आयोजन आळंदीत इंद्रायणी नदीच्या तिरावर करण्यात आले.
आळंदीत नदी परिसरात तसेच परिसरातील रस्त्यावर मोठ्या संख्येने उत्तर भारतीय भाविक, नागरिकांनी सह कुटुंब गर्दी केली. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तिरांवर मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करण्यात आला. छठ महापर्व हा कार्तिक मासातील षष्ठी तिथीला साजरा केला जाणारा महापर्व आहे. या पूजेमध्ये सूर्यदेवाची ३ दिवस निर्जला उपवास ठेवून श्रद्धा आणि विश्वासाने उपासना केली जाते. सूर्यदेवाला संध्या अर्घ्य अर्पण केले. 16 तारखेला सकाळी प्रातः अर्ध्य देण्यात येणार आहे.

यामध्ये छठ व्रतींचे आगमन उत्साहात झाले. स्वागत, दीपप्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्या अर्घ्य, कार्तिकी अन्नदान, प्रातः अर्घ्य, महाप्रसाद वितरण उत्साहात झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी कृपाशीर्वाद गुरूवर्य ह.भ.प. मारुती बाबा कुन्हेकर, गुरूवर्य ह.भ.प. नारायण महाराज जाधव मान्यवरांचे लाभले. याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, बाबाराजे तापकीर पाटील, श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्टचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, मराठा सेवक अरुण कुरे व सर्व आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन श्री शंकराचार्य समिती आणि सुधीरकुमार शर्मा, अन्नू भारद्वाज यांनी केले. यावेळी डॉ. अनु कृष्णा, मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायाधीश शिवदास महाजन, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या उपाध्यक्ष सीमा आनंद, डॉ. सुनिता पाटसकर, सुधीरकुमार शर्मा, राकेश महतो, श्यामलालजी, अरविंद सिंह, जितेंद्र सिंह, कृष्ण एस भारद्वाज, दारासिंह, धर्मेंद्र सिन्हा, राजेश यादव, उपेंद्र यादव, धर्मेंद्र सिंह आदी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेत छठ महापर्व २०२६ चे यशस्वी आयोजन केले.









