Author: Hindavinewsnetwork@gmail.com
कर वसुलीत वाकड अव्वल; पालिकेच्या तिजोरीत ४१२.९७ कोटींची भर मालमत्ता करसवलतींचा लाभ घेण्यास शेवटचे काही दिवस पिंपरी, (हिंदवी न्यूज)l- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनात ४१२ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाख ६५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी जवळपास ४१२ कोटी ९७ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला असून, कर संकलनात सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांपैकी वाकड विभागाने सर्वाधिक ५६.३९ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे. तसेच, त्याखालोखाल थेरगाव विभागाने ३७.३६ कोटी, कस्पटे वस्ती विभागाने ३२.९१ कोटी, किवळे विभागाने ३०.३८…
१०४ हजार चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त. नाले, रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ, नाले तसेच अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ८२० ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ४५१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे १ लाख ४ हजार २७०.९६ चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध नाल्यांवरील २३ अतिक्रमणे हटविण्यात आली असून अंदाजे ८३९…
पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना पिंपरी, (हिंदवीन्यूज)- कचरा व्यवस्थापनात नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसून येत आहे. महापालिकेच्या शून्य कचरा संकलन (झिरो वेस्ट स्लम) उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या महिनाभरात ११.४७ टन कचऱ्याचे स्रोतस्तरावर विलगीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमात १९ हजार ८०५ घरांनी सहभाग नोंदविला आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, महिनाभरात कालावधीत ९.९७ टन ओला कचरा आणि १.५० टन सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. याशिवाय, ६४३ किलो सॅनिटरी कचऱ्याचे सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले. कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती प्रक्रियेला गती मिळत असून, पर्यावरणीय परिणाम कमी करण्यास मदत होत आहे. कचरा डेपोवरील वाढता…
पिंपरी,(हिंदवी न्यूज) -अधिक मासाचे औचित्य साधून तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत तसेच ओम साई ग्रुप, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णायन’ या तीन दिवसीय भागवत कथाकथनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत येथे दिनांक ११ ते १३ जून या कालावधीत संपन्न झालेल्या ‘कृष्णायन’ या कृष्ण कथेला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पंढरपूर येथील रहिवासी प्रवचनकार विनया कुलकर्णी – उत्पात यांनी श्रीमद् भागवत कथेतील दहाव्या स्कंधातील कथेत यशोदा मातेच्या घरी बालपण, माती खाणे, उखळाला बांधले जाणे, गोपींच्या घरी माखनचोरी करणे पूतना, बकासूर, तृणावर्त अशा राक्षसांचा वध, कालियामर्दन, रासलीला, गोपीप्रेम, यांद्वारे भक्तीचा सर्वोच्च मार्ग दाखवला. तसेच मथुरागमन, कंसवध, द्वारकालीला,…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- ‘कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर गरिबी, बेरोजगारी, वैमनस्य, पैशाचा अथवा संपत्तीचा मोह, चुकीच्या संकल्पना यामुळे गुन्ह्यास प्रवृत्त होते. त्याचे कृत्य कायद्याच्या विरोधात असलेतरी कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे!’ असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले. दर्द से हम दर्द तक, सुप्रा लीगल फाउंडेशन, मुंबई विधीसेवा प्राधिकरण या संस्थांच्या वतीने बहाई सेंटर सभागृह, मुंबई येथे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे, फौजदारी कायदा आणि विनामूल्य कायदेशीर साहाय्य क्षेत्रातील (इंटर्नशिप) प्रशिक्षण अनुभव या दिनांक १६ मे ते १३ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती श्रीराम मोडक बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पवनकुमार…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)-प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या श्रवणीय आणि सुमधुर हिंदी – मराठी चित्रपट गीतांच्या बहारदार सांगीतिक मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, सुचिता शेटे, ॲड. स्मिता शेटे, उषा शेटे, पिंपरी – चिंचवड शिवसेना (शिंदे गट) प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, नेहा चौधरी, मुकेश चौधरी, विलास गाधडे, मोहन भस्मे, विकास जगताप, पांडुरंग म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वंदना पगारे यांचे अभीष्टचिंतन चिंतन करण्यात आले. तसेच पीथमपूर बॉम्बे या कंपनीने लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जागतिक दर्जाच्या नेल्सन ग्लोबल कंपनीकडून प्राप्त झालेल्या…
समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान पिंपरी, (हिंदवी न्यूज) -कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला बळ प्रदान करून तिला शुद्ध आणि समृद्ध केले!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे व्यक्त केले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, डाॅ.…
पिंपरी,(हिंदवीन्यूज)- ‘जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी महान भारत घडविण्याचा आपण संकल्प करूया!’ असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी चापेकर पुतळा, गणेशखिंड, पुणे येथे केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित पुण्यातील गणेशखिंड ते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय दरम्यानच्या मशाल दौड आणि बाईक रॅलीचे उद्घाटन करताना बलकवडे बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, डाॅ. शकुंतला बन्सल, डाॅ. नीता मोहिते, व्यवस्थापक अतुल आडे, ॲड. अक्षय कदम या मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गिरीश…
परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ उत्साहात पिंपरी, (हिंदवीन्यूज)-‘जागतिक पातळीवर भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांनी पुणे विद्यार्थी गृह शिक्षण संकुल सभागृह, पर्वती, पुणे येथे केले. भाषा अकॅडमी, पिंपरी आयोजित परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सविता केळकर बोलत होत्या. जर्मन भाषातज्ज्ञ अरविंद लिगाडे, ज्येष्ठ विद्यापीठ भाषा संचालक जावेद अत्तार, पुणे विद्यार्थी गृह संचालक सुनील रेडेकर, जापनीज भाषातज्ज्ञ गंधाली शिधये, भाषा अकॅडमीचे संस्थापक – अध्यक्ष दीपक पागे, संचालिका प्रीती गायतोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सविता केळकर पुढे म्हणाल्या की, ‘स्वतःच्या मनाचा…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)-न्यू इंग्लिश स्कूल, माण, तालुका मुळशी आणि दिलासा संस्था, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा पहिला दिवस प्रार्थना, वृक्षारोपण, कविता सादरीकरण, एस एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याने गाजला. न्यू इंग्लिश स्कूल, माण इथल्या शाळेतील पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. रंगीत खडूंनी फळ्यावर कार्यक्रमाची रूपरेषा लिहिली. सोनचाफा आणि बकुळीचे झाड लावण्यासाठी खड्डे तयार केले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी हळद, कुंकू, निरांजन, फुलाचे ताट सजवले; आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्साहात जय्यत तयारी केली होती. पिंपरी – चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्घाटक शिवव्याख्यात्या सुलभा सत्तुरवार तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी, गझलकार सुहास…