Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी,(हिंदवी न्यूज)-वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने दुर्बल, गरजू, पीडित, वंचित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यता निधी वाटप व दहावी  व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर रवी लांडगे,  तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राध्यापिका शिल्पागौरी गणपुले उपस्थित होत्या. फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य मदत केली जाते. व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जातो. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी फाउंडेशन वतीने आत्तापर्यंत केलेल्या कामाची व आगामी काळातील कार्याविषयी माहिती दिली. महापौर रवी लांडगे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. वुई…

Read More

पिंपरी,(हिंदवी न्यूज)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसाचणे, ड्रेनेज तुंबणे आणि अस्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समस्यांची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी फ क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून निवेदनाद्वारे मागणी केली होती. मारुती जाधव यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून प्रशासनाने प्रभागातील स्टॉर्म वॉटर लाईन, नाले आणि ड्रेनेज लाईनची साफसफाई व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. भीमशक्ती नगर, कृष्णानगर, महात्मा फुले नगर, घरकुल, कोयना नगर, शरद नगर तसेच परिसरातील विविध भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी साचणे, रस्त्यांवर सांडपाणी येणे…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)-पिंपरी चिंचवड महापालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंत भोसले उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष यशवंत भोसले यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,”गेल्या १८ वर्षांपासून आमची संघटना पालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही पूर्ण ताकतीने काम करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी संघटना सदैव तत्पर आहे.” असेही ते म्हणाले.  मेळाव्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, ज्यावर…

Read More

पुणे, (हिंदवी न्यूज)- विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या उबेद खान यास एनडीपीएसचे विशेष न्यायाधीश एस. आर. पवार यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याने ॲड. प्रणय महाजन यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. खान याचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून त्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तो वयाने लहान असून तो न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन करण्यात तयार असल्याचा युक्तिवाद सिनिअर ॲड. विपुल दुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. प्रणय महाजन यांनी जमीन अर्जावर युक्तिवाद केला. त्यांना ॲड. रोहित राहिंज आणि ॲड. दीपक खेडकर यांनी सहकार्य केले. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन मंजूर केला. एप्रिल 2026 रोजी घडलेल्या…

Read More

महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पुणे, (हिंदवी न्यूज) – विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघातर्फे करिअर सिरीज यशाच्या वेगळ्या वाटा या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या जर्मन लँग्वेज बूस्टर कोर्स’ या जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची सांगता बक्षीस समारंभाने करण्यात आली. यानिमित्त महासंघातर्फे बक्षीस वितरण व कौतुक सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जर्मन लँग्वेज A ग्रेड परीक्षेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यातआले.  दहावीच्या परीक्षेमध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या ३१ विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महासंघातर्फे या मुलांना कमवा व शिका या योजने अंतर्गत जर्मनी मध्ये मोफत शिक्षण व स्टायपेंड सह जॉब मिळवण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात येणार आहे…

Read More

सवलतींचा लाभ घेण्यासाठी काही दिवस शिल्लक पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या विविध कर सवलतींचा अधिकाधिक लाभ घेता यावा, यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी    ( २७ व २८ जून) महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८ जून पर्यंत ३८१ कोटी ६० लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ताधारकांना विविध सवलती जाहीर केल्या…

Read More

श्रीटिकेल  कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयाच्या सहकार्याने पिंपरी औद्योगिक वसाहतीतील श्रीटिकेल कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालय रक्त केंद्रासाठी व पुणे शहरातील पूना हॉस्पिटल या रक्तकेंद्राच्या वतीने श्रीटिकेल कंपनीचे डॉ राजेश पांढरीपांडे यांच्यासह कंपनीतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी एक सामाजिक बांधिलकी जपत अप्रत्यक्षरीत्या सेवा कार्यात सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण २७५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी वाय.सी. एम. रुग्णालयाच्या रक्त केंद्राचे प्रमुख डॉ.…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या यंदाच्या संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या ११० प्राथमिक व २४ माध्यमिक अशा एकूण १३४ शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. विशेष बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय योग दिन यंदा रविवारी आला असतानाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शाळांमध्ये उपस्थिती दर्शविली. सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी स्वखुशीने सहभाग नोंदवत योगाबद्दलची जागरूकता आणि उत्साह दाखवून दिला. योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. यंदाच्या “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका आणि योग विद्या धाम, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योगाभ्यास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योगाभ्यास केला. कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे, उपआयुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी दिपक कन्हेरे, प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, योग विद्या धाम, निगडीचे प्रमुख प्रमोद निफाडकर, योगिनीज योगा क्लासेसच्या संचालिका योगिता तरडे तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या शीतल मारणे उपस्थित होते. ओंकार उच्चारण व प्रार्थनेद्वारे…

Read More

पुणे, (हिंदवी न्यूज)- जागतिक योग दिनानिमित्त पुणे बार असोसिएशन तर्फे शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथे वकील वर्गासाठी विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वकिलांच्या दैनंदिन व्यस्त  जीवनात त्यांचे आरोग्य, मानसिक संतुलन आणि तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात साविता खानापुरे, (Savi’s Yoga) तसेच श्रद्धा धनवे यांनी योगा सेशन्स घेतले. यात त्यांनी विविध योगासने, श्वसनक्रिया आणि दैनंदिन जीवनात करता येणाऱ्या सोप्या योगप्रकारांचे मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे होणारे  लाभ, कामातील एकाग्रता  आणि तणाव कमी होण्यास योगसाधना मुळे कशी मदत होते, याबद्दल योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राम भुजबळ यांनी योगाचे महत्त्व सांगितले.…

Read More