Author: Hindavinewsnetwork@gmail.com

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम यांच्यासह महापौर रवि लांडगे उपस्थित पिंपरी,(हिंदवी न्यूज)- छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महापौर रवि लांडगे यांनी यावेळी ध्वज फडकवून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 🗣💬छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा प्रेरणादायी…

Read More

आळंदीत हरिनामाचा जयघोष ; ग्रंथ साहित्य संपदा वाटप आळंदी ( हिंदवी न्यूज) : येथील श्री निकेतन गुरुकुल विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात करण्यात आला. यावेळी हरिनामाचा जयघोष करत ग्रंथ संपदा साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी होते. या प्रसंगी ह.भ.प. विश्वकर्मा महाराज पांचाळ, श्री राम मंदिराचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, विश्वंभरभाऊ पाटील, कैलास आव्हाळे, माऊली जाधव, संस्थेचे शरद उपाध्ये, अंजली उपाध्ये, कविता उपाध्ये, डॉ. अश्विनी कुलकर्णी, मुख्याध्यापक मोहिनी भदाणे, पुनम शिरसाठ, समन्वयक स्नेहल कुंभार आदी उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत, श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमा पूजन, मान्यवरांचा सत्कार व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.…

Read More

आळंदी,(हिंदवीन्यूज) :  श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढ वारी पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोड सेवा देण्यावरून सुरू असलेला वाद अखेर सामोपचाराने मिटला आहे. बैलजोड निवड समितीने तिन्ही अर्जदारांना सेवेची संधी देण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद संपुष्टात आला आहे. आता पालखी सोहळ्यात पुणे जिल्ह्यासाठी हर्षवर्धन रानवडे, सातारा जिल्ह्यासाठी उमेश रानवडे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी तुळशीराम रानवडे हे अनुक्रमे बैलजोड सेवा देणार आहेत. पालखी सोहळ्याची परंपरा आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन समितीने तिन्ही मानकरीना सेवा विभागून दिली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आळंदी देवस्थानने पुढाकार घेतला याबाबत सात तास बैठक चालली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यातआले, मात्र शेवटी सर्वानुमते सुवर्णमध्य काढण्यात यश आले.…

Read More

निगडीत ‘लोकशाही रक्षकांचा’ कृतज्ञता सोहळा संपन्न; आमदार श्रीकांत भारतीय यांनी कार्यकर्त्यांना दिला देशसेवेचा कानमंत्र! पिंपरी, (हिंदवी न्यूज)- रोजी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला ५१ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळ्यात आणीबाणीच्या काळातील संघर्षाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला. आमदार श्रीकांत भारतीय यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून नव्या पिढीसाठी संघर्षाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय जनता पक्षाचा उदय हा आणीबाणीच्या काळात लोकांनी दिलेल्या असीम समर्पणातून झाला असून, ‘संघर्ष’ हा आमच्या पक्षाचा डीएनए (DNA) आहे, असे ते ठामपणे म्हणाले. इतिहास…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्य प्रभाग क्रमांक ३१ मधील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका  पल्लवी महेश जगताप यांच्या नूतन सेवा व संवाद कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. २८) सायंकाळी ६ ते ९ या वेळेत  उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिंचवड विधानसभेचे  आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नुकतीच मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने संजय मराठे यांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यानंतर परिसरातील नागरिकांशी आमदार शंकर जगताप तसेच पल्लवी जगताप यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन सेवा व संवाद कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवा आणि…

Read More

“समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य ” : योगेश सोमण. पिंपरी, ( हिंदवीन्यूज)-  समरसता साहित्य परिषद , पिंपरी चिंचवड शाखा, संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने”साहित्यिक संवाद” हा साहित्यिक उपक्रम स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृह ,निगडी – प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण हे होते. समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच समरसता गीत अन् सुभाष चव्हाण यांनी केलेल्या मधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आर्चिस केळकर, सुनिता कुलकर्णी, उज्वला केळकर यांनी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, डॉ. हेडगेवार…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) : अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ हा बहारदार कलोत्सव पद्माकर कुलकर्णी रामकृष्ण सभागृह, चिंचवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगीत, नृत्य, कविता, लोककला, चित्रकला, मिमिक्री, ग्राफिटी, अभिवाचन आणि कराओके अशा विविध कलाप्रकारांनी सजलेल्या या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात भगवान नटराज पूजन व पारंपरिक गाण्याने झाली. बालकलाकार कु. व्रिहा काळे हिने सादर केलेल्या आकर्षक गणेशवंदनेने कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ झाला. त्यानंतर शिवाजी घोडे यांच्या सुमधुर सॅक्सोफोन वादनाने सभागृह सुरेल स्वरांनी भारावून गेले. कविसंमेलनात वंदना इन्नानी आणि अशोक होनराव यांनी आपल्या प्रभावी कवितांमधून रसिकांची भरभरून दाद मिळवली. जयवंत भोईर…

Read More

हिंदवी न्यूज | देवळाली कॅम्प देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शिंगवे बहुला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली.या देवळाली परिसरातील २३ केंद्रांवर सुमारे ५,५०० बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. प्रभाग क्रमांक चारमधील बालगृह रोडवरील उद्यानात आयोजित पोलिओ मोहिमेचे उद्घाटन बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड, डॉ. अश्विनी राठोड, नीलप्रभा देशमुख, गायत्री गोडसे, रोशन गजरे तसेच बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे आदी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या सुप्रिटेंडेंट डॉ. मनीषा होनराव, डॉ. नरेश दौलत, डॉ. शाहू पाटील, डॉ. बावस्कर यांच्यासह नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. जयश्री पाटील यांच्या…

Read More

बनावट औषध, अन्नधान्यातील भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती शिबिर घ्यावे पिंपरी, (हिंदवी न्यूज)- राज्यातील बोगस डॉक्टर, बनावट औषध विक्री करणारे आणि दूध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे पत्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शुक्रवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील दापोडी, फुगेवाडी येथे मागील महिन्यात विषारी दारू पिऊन २२ नागरिकांचा मृत्यू झाला. या दारूकांडातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा “मकोका” अंतर्गत कारवाई…

Read More

“प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही गुन्हेगार!” पिंपरी,(हिंदवी न्यूज)- पत्रकारांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. संबंधित खासदार संजय दिना पाटील यांनी माफी मागून प्रकरण संपणार नसून, त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. चिंचवड येथील के.एस.बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनाची सुरुवात शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांनी घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविला. आंदोलनावेळी “प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही गुन्हेगार!” अशा आशयाचे फलक दाखवत तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यापुढे  पत्रकारांचा…

Read More