Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पिंपळे गुरव, (हिंदवी न्यूज)- योगवेद क्लासतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व ओंकार उच्चाराने करण्यात आली. त्यानंतर विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्राणायाम व ध्यानाचा सराव करून योगाचे महत्त्व अनुभवले. या प्रसंगी योग प्रशिक्षक अस्मिता आकडकर यांनी योगाचे आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगत नियमित योग करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे सहभागींच्या मनात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. योग दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय मराठे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून डॉ. दत्तात्रय…
योगाद्वारे आरोग्य जागरूकता व सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश पिंपरी, (हिंदवी न्यूज)- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये योग आणि आध्यात्मिक जागृतीवर आधारित कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पुणे झोनचे झोनल इंचार्ज अशोक अहुजा यांनी माहिती देताना सांगितले की, संत निरंकारी मिशनची शाखा भोसरी, पिंपरी, रुपीनगर येथेही योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्रद्धाळू भक्तगण, सेवादल स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आर्ट ऑफ लिविंगचे योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित योग सत्रात सहभागी झालेल्या सर्वांनी योगाभ्यास करून निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- अभिनेत्री तथा खासदार कंगना रानौत निर्मित “भारत भाग्य विधाता” हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज तापडिया, चित्रपट निर्मात्या बबीता अशीश्वाल, अभिनेत्री गिरिजा ओक आणि स्मिता तांबे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान चित्रपटाच्या निर्मितीमागील संकल्पना, कथानक आणि समाजाभिमुख विषयांबाबत चर्चा करण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यावेळी महा मेट्रो पीसीएमसीच्या ब्रँड ॲम्बेसेडर संगीता तरडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘चित्रपट हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ‘भारत भाग्य विधाता’सारखे चित्रपट समाजात सकारात्मक…
कामांच्या प्रगतीचा आढावा; नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना पिंपरी,(हिंदवी न्यूज) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच कामांदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पीसीएमसी मेट्रो स्टेशन ते निगडी या मार्गावरील विविध विकास कामांच्या अनुषंगाने गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी आयोजित पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी,…
सीएसआर निधीतून साकार होणार ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल; महापालिकेवर एक रुपयाचाही आर्थिक भार नाही. निधी कमी पडल्यास महापौर स्वतः करणार आर्थिक मदत. पिंपरी, (हिंदवी न्यूज)– पिंपरी चिंचवड शहराला केवळ औद्योगिक नगरी म्हणून नव्हे, तर ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने महापौर भा. रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘अक्षरविश्व’ या अत्याधुनिक ज्ञानसंकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. १५ जून २०२६ रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मौजे भोसरी (कासारवाडी) येथील सार्वजनिक सुविधा क्षेत्रातील सुमारे ८,८३१.३६ चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक ग्रंथालय आणि ज्ञानसंकुल उभारण्याच्या उपसूचनेस मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी यांच्या माध्यमातून…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)-महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेत नागरिकांच्या तक्रारी, सूचना तसेच विविध विषयांबाबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी दर मंगळवार व गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक भेटीचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत विविध विभागांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आयुक्त कार्यालयात उपस्थित राहतात. मात्र, नागरिकांची वाढती संख्या आणि त्याचवेळी अनेकदा अचानकपणे येणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण बैठका तसेच स्थानिक…
४४ हजारांचा दंड वसूल पिंपरी, (हिंदवी न्यूज)- स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, विविध भागांत केलेल्या कारवायांमधून ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अशा प्रकारांवर ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि ग्रीन मार्शल पथकाने विविध भागांत तपासणी मोहीम राबविली. रहाटणी-थेरगाव परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष तपासणीदरम्यान संबंधित वाहनातून…
वारकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध संस्थांशी महापालिकेचा समन्वय पिंपरी, (हिंदवी न्यूज) – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांना आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक आयोजित केली. उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी केंद्रांचे नियोजन, स्वच्छता व्यवस्थापन, सुलभ शौचालयांची उपलब्धता, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने पवना धरणातून केला जातो. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला असून यंदा मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिनांक २० जून २०२६ पासून शहरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे तसेच उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडून खालील नमूद केल्याप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत : • स्विमिंग पूल भरण्यासाठी किंवा…
एशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत फडकवला तिरंगा पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘आयर्नमॅन’ (Ironman) या जागतिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन करून पिंपरी-चिंचवड शहराची मान जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या थेरगाव येथील रहिवासी श्री. दिनेश कपूर आणि श्रीमती योगिता कपूर या दांपत्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विशेष गौरव करण्यात आला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. ♣जर्मनीच्या भूमीवर फडकवला भारताचा तिरंगा जर्मनीतील हॅम्बर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘युरोपियन चॅम्पियनशिप’मध्ये कपूर दांपत्याने आपली जिद्द आणि चिकाटी सिद्ध केली. या स्पर्धेमध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर…