Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पिंपरी, (हिंदवी न्यूज) -पिंपरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेले संजय दीना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरीत पत्रकारांनी बुधवारी तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या निषेध आंदोलनात गोविंद वाकडे, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, संतोष मिश्रा, रोहित आठवले, बाळासाहेब ढसाळ,विजय जगताप, अनिल वडघुले यांनी यावेळी खा. संजय दिना पाटील यांचा निषेध करणारी भाषणे केली. या आंदोलनात मिलिंद कांबळे, विजय जगताप, अमोल काकडे, नरेश नातू, सुरज कसबे, राजेश स्टीफन, अतुल मारवाडी, प्रसन्न तरडे,…
शब्दवैभव काव्यसंमेलनात त्रैभाषिक संगम पिंपरी (हिंदवी न्यूज)- ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामुळे निर्माण झालेला बनारस (काशी) – महाराष्ट्र हा ऐतिहासिक अनुबंध शब्दवैभव काव्यसंमेलनाने अधिकच दृढ झाला आहे!’ असे विचार बनारस येथील ज्येष्ठ हिंदी लेखिका कुमकुम सिंह यांनी शिवयोगी भवन, भगत वस्ती, इंद्रायणीनगर, भोसरी येथे व्यक्त केले. पिंपरी – चिंचवड साहित्य मंच आणि संत साई स्कूल, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शब्दवैभव’ या मराठी, हिंदी आणि उर्दू त्रैभाषिक काव्यसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुमकुम सिंह बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक भगवान पठारे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा रवी लांडगे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, प्रा. संजय पवार, संत साई स्कूलचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर…
२३५० सायकलस्वारांचा विक्रमी सहभाग; भारतातील सर्वात मोठ्या सायकल वारीचा मान पिंपरी,(हिंदवी न्यूज)- संपूर्ण भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रा कार्यरत असलेल्या इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी शनिवारी (२० जून) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहू येथील गाथा मंदिरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग नोंदवत २३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यंदाचे वर्ष सायकल वारीच्या दहाव्या पर्वाचे असल्याने सहभागींचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. मागील सर्व वर्षांतील विक्रम मोडत यंदा देशभरातून आलेल्या सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पीसीएमसीचे बापूसाहेब गायकवाड, एमआयडीसीचे अधिकारी प्रकाश शेटबाळे, उद्योजक अन्नारे बिरादार, तात्यासाहेब शेवाळे, बैद्यनाथ हॉस्पिटल संभाजीनगरचे डॉ.…
या अधिवेशनात “संतभूमी” चा विषय मंजूर करून घ्या – हभप राजू महाराज ढोरे पिंपरी, (हिंदवीन्यूज)-महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली, तळवडे या पंचक्रोशीस वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून “संतभूमी” मानतो. त्यामुळे देहू ते आळंदी हा १६ किलोमीटर चा पालखी मार्ग राज्य सरकारने “संतभूमी” म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अभय टिळक बोलत होते. यावेळी हभप राजू…
पिंपरीत ‘संविधान हत्या दिन’निमित्त विशेष व्याख्यान: आणीबाणीच्या ५१ वर्षांनंतरही लोकशाही रक्षणाची शपथ
पिंपरी,(हिंदवी न्यूज)-भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील २५ जून १९७५ हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस मानला जातो. याच दिवशी देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या काळातील काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे झालेली संविधानाची अवहेलना आणि लोकशाहीची झालेली गळचेपी, याचा इतिहास आजच्या तरुण पिढीला कळावा, या उद्देशाने पिंपरी येथील आर्य समाज कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘संविधान हत्या दिन’ आणि ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “२५ जून १९७५ रोजी तत्कालीन सरकारने सत्तेच्या हव्यासापोटी संविधानातील…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- २५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत.भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या त्या काळातील काँग्रेस पक्षाचा काळा इतिहास तरुण पिढीला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कळावा,या उद्देशाने दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ आणि ‘संविधान हत्या दिन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दिघी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना शुभम खेडेकर म्हणाले की, “२५ जून १९७५ रोजी…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेतील जे सुरक्षा रखवालदार पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यांना सुरक्षा सुपरवायझर ऐवजी सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधी समिती सदस्य तथा नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे, नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त राजेश आगळे, सिताराम बहुरे, संदीप खोत, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमध्ये…
धोरणात्मक निर्णयातून शहराच्या विकासाला प्राधान्य : सभापती अभिषेक बारणे पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जलनिस्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, नागरी सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासंदर्भातील प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो फेज-१ विस्तार प्रकल्पांतर्गत निगडी येथील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली. पिंपरी…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- मालमत्ता करावरील आकर्षक सवलतींचा लाभ घेण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांकडे आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वेळेत कर भरणाऱ्या, ऑनलाइन मालमत्ता कर, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या संस्था आणि आस्थापनांसाठी ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या विविध सवलती देण्यात येत आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम तारीख असून त्यानंतर पूर्ण कर भरावा लागणार आहे. महानगरपालिकेने वेळेत कर भरणाऱ्या, ऑनलाइन मालमत्ता कर, महिलांच्या नावावर मालमत्ता असलेल्या तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या नागरिकांसाठी आणि संस्थांसाठी विशेष सवलती लागू केल्या आहेत. अनेक मालमत्ताधारकांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे. तसेच अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही.…
नागरिकांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांचे पोलिओ लसीकरण करून घेण्याचे वैद्यकीय विभागातर्फे आवाहन पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे. या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण…