Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. या सभेमध्ये शहरातील पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते विकास, आरोग्य सेवा, स्वच्छता, माहिती तंत्रज्ञान तसेच विविध प्रशासकीय विषयांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीस स्थायी समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सन २०२५-२६ करिता चिंचवड रायसिंग मेनच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ६…

Read More

३० जूनपर्यंत १० टक्के सवलतीचा घेता येणार लाभ, त्यानंतर थकबाकीदारांवर कठोर कारवाई पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना बिल वाटपासोबत जप्तीपूर्व नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे तसेच व्यावसायिक आणि बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेकडून मालमत्ताधारकांना ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरल्यास सामान्य करावर…

Read More

अवघ्या दोन दिवसांत जलवाहिनीचे काम पूर्ण, नागरिकांत समाधान. पिंपरी, (हिंदवी न्यूज)- कासारवाडी प्रभाग क्रमांक २० मधील रेल्वे गेटजवळील लोंढे चाळ परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. रेल्वे हद्दीलगतच्या जागेतून नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक परवानगी मिळत नसल्याने हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पर्यायी मार्गाचा अवलंब करत अवघ्या दोन दिवसांत नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण केले असून परिसरात आता स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे. लोंढे चाळ परिसरातून खराब पाण्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने कामाला गती मिळू…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी (निवृत्ती वेतन लाभ) आणि बोनसचा गंभीर प्रश्नही प्रशासनासमोर मांडला असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महापालिकेने थेट ‘प्रिन्सिपल एम्प्लॉयर’ (मुख्य नियोक्ता) म्हणून जबाबदारी घ्यावी या संदर्भात महापौर रवी लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी होकार दर्शवल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की,सध्याच्या प्रथेनुसार महापालिकेचे टेंडर (कंत्राट) बदलले की जुना कंत्राटदार निघून जातो. अनेक वर्षे काम करूनही कर्मचारी निवृत्त झाल्यावर किंवा त्याला कामावरून…

Read More

महापालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन पिंपरी, (हिंदवी न्यूज)-थोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या शौर्य व स्वाभिमानाचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसदस्य प्रा.उत्तम केंदळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, उपायुक्त अण्णा बोदडे,…

Read More

वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांना सूचना पिंपरी, (हिंदवी न्यूज)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापलिकेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व आवश्यक सुविधा नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच वारकऱ्यांसाठी   विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पालखी मार्गावर येणाऱ्या वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी…

Read More

अल निनोच्या परिणामामुळे पावसाला विलंब. पाण्याचा अपव्यय टाळून पावसाचे पाणी साठवण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आवाहन पिंपरी, (हिंदवी न्यूज) – शहरातील जलस्रोतांवरील वाढता ताण आणि यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना पाणी बचतीसंदर्भात विविध उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहन धुण्याचे टाळावे. व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांनी पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या यंत्रणांचा वापर करावा. तसेच खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये नवीन पाणी भरणे शक्यतो टाळावे.घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये फ्लश…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” तसेच इंडियन आयडॉल फेम अबोली जरीत यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी…

Read More

खेळणी, पुस्तके, कपडे व इलेक्ट्रॉनिक साहित्याचा पुनर्वापर  पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महापालिकेच्या‘आर.आर.आर. (रिड्यूस, रियूज, रिसायकल)’ संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागांतून ४५३ वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. या वस्तूंचे एकूण वजन ६२८.७५ किलो इतके असून, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या, मात्र पुनर्वापरयोग्य वस्तू स्वेच्छेने आर.आर.आर. केंद्रांवर जमा केल्या. यामध्ये खेळणी, पुस्तके, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच विविध घरगुती वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचा पुनर्वापर होण्यास मदत होत असून, कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याबरोबरच नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनालाही हातभार लागत आहे. आर.आर.आर. उपक्रमाच्या माध्यमातून ‘कमी वापरा, पुनर्वापर करा आणि…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCM) व इतर वैद्यकीय विभागांमध्ये गेली १५ ते १८ वर्षे केवळ १० ते १५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या १४२ नर्सेस आणि टेक्निकल स्टाफला कायमस्वरूपी (परमनंट) करण्याऐवजी, त्यांच्या हक्काच्या जागेवर नवीन भरती करण्याचा घाट तत्कालीन प्रशासनाने घातला होता. मात्र, राष्ट्रीय श्रमिक आघाडीने या अन्यायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत नवीन भरतीला स्थगिती मिळवली आहे. या भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी महापौर रवी लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असता दोघांनी मानधनावरील नर्सेसना न्याय देण्याची ग्वाही दिली आहे. तसेच शहरातील आमदार, खासदार व सर्व लोकप्रतिनिधींनी…

Read More