Author: Hindavinewsnetwork@gmail.com

१६४ काेटींचे  टप्या-टप्याने हाेणार समायाेजन पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील २०२३ पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर राज्य सरकारने माफ केल्यानंतर आतापर्यंत ९६ काेटी १२ लाख रूपयांचे समायाेजन केले आहे. २०२६-२७ या वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचेही मालमत्ता करामध्ये समायाेजन करण्यास बुधवारी (दि.१०) स्थायी समितीने मान्यता दिली . पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना २०१२-१३ पासून शास्तीकर वसूल केला जात हाेता. ३ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ मार्च २०२३ पूर्वी झालेल्या २५ हजार ६७३ अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळाला. या मालमत्ता धारकांनी शास्तीकराची २६० काेटी ५३ लाख रूपयांची…

Read More

पिंपरी,(हिंदवी न्यूज) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर…

Read More

घर सूचीकरण व घर गणनेसाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागावर प्रशासनाचा भर पिंपरी, (हिंदवी न्यूज) : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या घर सूचीकरण व घर गणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अल्प कालावधी उरला असून, नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे. देशातील सर्वात मोठा लोकसहभागाचा उपक्रम असलेल्या जनगणनेद्वारे लोकसंख्या, निवास व्यवस्था, शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक व आर्थिक स्थितीविषयीची माहिती संकलित केली जाते. याच माहितीच्या आधारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा आणि विकास आराखड्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक घराची अचूक नोंद होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका…

Read More

उपस्थितांनी घेतली जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ; पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प. पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा निर्धार महापालिकेने केला. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गाटेकडी येथे मान्यवरांच्या हस्ते १,००० रोपांची लागवड करून ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय जगताप लिखित ‘दुर्गा टेकडीचा ५० वर्षांचा इतिहास’ या…

Read More

पिंपरी,(हिंदवी न्यूज) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच यावराषीही ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पिंपरी चिंचवड कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे…

Read More

वायसीएम रुग्णालयातील तातडीच्या उपचारांमुळे रुग्णांना मिळाले नवजीवन पिंपरी,(हिंदवी न्यूज)- फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात बाधित तीनही रुग्णांची प्रकृती आता सुधारली असून त्यांनायशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार या सर्व रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले. विषारी दारू सेवनामुळे गंभीर स्थितीत रुग्णांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि विशेष निगा पुरविण्यात आली. रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि आवश्यक औषधोपचार यांच्या मदतीने रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  स्थायी समिती सभेत शहराच्या सर्वांगीण विकास, आरोग्य सुविधा बळकटीकरण, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते देखभाल तसेच सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सभेत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याच्या (टप्पा क्र. १) कामास मंजुरी देण्यात आली. संविधानातील लोकशाही, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे जतन आणि प्रसार करण्यासाठी संविधान भवन महत्त्वपूर्ण ठरणार असून विविध शैक्षणिक, सामाजिक आणि…

Read More

पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर; अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे निर्देश पिंपरी, (हिंदवी न्यूज) – आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मान्सूनपूर्व तयारीला वेग आला असून, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले व नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून सखल भागात पाणी साचू नये तसेच पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना डॉ. सूर्यवंशी यांनी नदी व नाल्यांच्या वहनक्षमतेबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची दखल घेऊन तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा…

Read More

महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर,आयुक्त यांचे समवेत महापालिकेचे अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत; पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार पिंपरी, (हिंदवी न्यूज)-उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सोमवार, दि. १५ जून २०२६ पासून पुन्हा सुरू होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषतः इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व महापालिका शाळांमध्ये ‘शाळा प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शाळा प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे,आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी,नगरसदस्य अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची उत्साहपूर्ण सुरुवात…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) : – भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय अभियानांतर्गत देशातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानात शहरातील ग्रंथालये, संग्रहालये, शैक्षणिक संस्था, मठ, संशोधक तसेच खाजगी संग्राहकांनी सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध हस्तलिखितांची माहिती महानगरपालिकेकडे सादर करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘ज्ञानभारतम्’ ही योजना केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आली असून भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन हा तिचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार पपायरस, चर्मपत्र, भूर्जपत्र, ताडपत्र, कागद किंवा तत्सम साधनांवर हाताने लिहिलेला मजकूर…

Read More