Author: Hindavinewsnetwork@gmail.com
भोसरी, पिंपरी, रुपीनगरसह देशातील १५०० हून अधिक केंद्रांवर योग शिबिरांचे आयोजन पिंपरी,(हिंदवी न्यूज)-‘निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या संकल्पाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी संत निरंकारी मिशन च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने व्यापक योग व आध्यात्मिक चेतना अभियान आयोजित करण्यात आले आहे. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार असून आरोग्य व आत्मिक उन्नती यावर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे. संत निरंकारी मिशनतर्फे रविवार दि., 21 जून रोजी सकाळी सहा वाजता पुणे जिल्ह्यातील मिशनच्या सत्संगभवन भोसरी, पिंपरी, रुपीनगर यासह देशातील १५०० हून अधिक केंद्रांवर एकाच वेळी योग शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. मिशनच्या विविध…
मुंबई, (हिंदवी न्यूज)- मुंबईतील नागरिकांसाठी रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी ६.३० वा. मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे “योगा बाय द बे” अंतर्गत भव्य योगा प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी ६.३० वाजता कीलाचंद चौक, सुंदरमहल जंक्शन, मरीन ड्राईव्ह येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोणत्याही पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. मुंबई माझी लाडकी, टाइम्स ऑफ इंडिया, कोस्ट गार्ड, द योगा इन्स्टिट्यूट, हार्टफुलनेस, तेरापंथ युवक परिषद दक्षिण मुंबई आणि डीआर ग्रुप यांच्या…
पिंपरी,(हिंदवी न्यूज )- अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी(दि.१७) अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठेंचे वंशज सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे. सकाळी संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापाशी समाधीला नतमस्तक होऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुण्यातून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानाकडे पायी आगेकूच करणार आहे. या पदयात्रेला शिवशाही व्यापारी संघ आणि हिंदू मातंग सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिली आहे. प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना दाखले म्हणाले की, अनुसूचित जातीच्या…
सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती सभेचेही लाईव्ह प्रक्षेपण करा – नगरसेवक संदीप वाघेरे पिंपरी,(हिंदवी न्यूज) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सोमवार पासून होणाऱ्या सर्व साधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रतिबंध केला असून हे बेकायदेशीर आहे. पुढील १५ दिवसात पूर्वीप्रमाणे सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करावे, अन्यथा नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करून दाद मागू, असा इशारा ॲड. असीम सरोदे यांनी दिला. सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे उपस्थित होते. ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सभांचे लाईव्ह प्रक्षेपण सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करणे आणि ते…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेने कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या शहरामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक गुणी कलाकार आहेत. या कलाकारांचे योगदान समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही किंवा त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळत नाही. अशा परिस्थितीत कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळते, तसेच युवा पिढीलाही कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले. शहराच्या नावलौकिकात आपल्या कर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)- ”रंगीत तालीम’ हा ज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यात्मक प्रवास आहे!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. प्रज्ञार्थ प्रकाशन निर्मित आणि कवी दामोदर कुलकर्णी लिखित ‘रंगीत तालीम’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ निरूपणकार आणि उद्योजक रवींद्र पाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाशिका प्रज्ञा रामतीर्थकर आणि कवी दामोदर कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. श्रोतृवर्गाचा उत्तम प्रतिसाद कार्यक्रमास लाभला होता. राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘अभियांत्रिकीसारख्या रूक्ष वातावरणात राहूनही कवी दामोदर कुलकर्णी यांनी आपली काव्यप्रतिभा जोपासली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीचाही मी…
पिंपरी,(हिंदवी न्यूज) – नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनपा हद्दीतील अनेक शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची शाळा सुरू होण्यापूर्वी नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अस्वच्छ पाण्याच्या टाक्यांमधून दूषित पाण्याचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांना गॅस्ट्रो, कावीळ तसेच पोटाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बारणे यांनी पत्रात नमूद केले…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) – केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) श्रेणीकरण (ग्रेडिंग) जाहीर केले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागाने (आयटीआय) उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत देशपातळीवर मानाचे स्थान मिळविले आहे.′ प्रशिक्षण महासंचालनालयाने आयटीआयद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा चलित ग्रेडिंग पद्धती लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डीजीटी एमआयएस पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व आयटीआयचे मूल्यमापन करण्यात आले. या ग्रेडिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयने १० पैकी ९.२ गुण प्राप्त…
वैयक्तिक व सामूहिक हरित उपक्रमांना मिळणार गुणांकन पिंपरी, (हिंदवी न्यूज) – वसुंधरेचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत ‘हरित शपथ’ या ई-प्रतिज्ञा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून वसुंधरा संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. उपक्रमांतर्गत नागरिकांना माझी वसुंधरेच्या https://majhivasundhara.in/en/pledge/MQ%3D%3D या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेता येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या ई-प्रतिज्ञा आणि त्यानुसार राबविण्यात आलेल्या कृतींच्या आधारे सहभागी व्यक्ती व गटांचे गुणांकन करण्यात येणार आहे. वृक्षसंवर्धन, जलस्रोतांचे जतन, कचरा व्यवस्थापन,…
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आरोग्य शिक्षण, संशोधन व सेवाभावी कार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प पिंपरी, (हिंदवी न्यूज)– भारतीय वैद्यक शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, सुसूत्रता, पारदर्शकता आणि संशोधन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर आरोग्य विषयक अभ्यासक्रमांना एक सक्षम शैक्षणिक दिशा देण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. आजच्या या विशेष दिनी आपण सर्वांनी वैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टता, नैतिक मूल्यांचे पालन, संशोधनवृत्तीचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…