Author: Hindavinewsnetwork@gmail.com

ऑनलाइन माध्यमातून २३० कोटींहून अधिक कर जमा.  दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांचा प्रतिसाद पिंपरी, (हिंदवी न्यूज) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ता कर वसुलीत लक्षणीय प्रगती नोंदविली आहे. १ एप्रिल ते २९ मे २०२६ या कालावधीत महापालिकेकडे २५० कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरातील २ लाख ४७ हजार ३७१ मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये डिजिटल माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले असून, २ लाख २१ हजार ७६३ नागरिकांनी ऑनलाइन कर भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २३० कोटी…

Read More

शहर विकासाला मिळणार दिशा पिंपरी,(हिंदवी न्यूज)-  देशाच्या सामाजिक, आर्थिक व नागरी विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत जनगणना कर्मचारी सक्रियपणे योगदान देत आहेत.  शहरातील विविध विभागांतील कर्मचारी सध्या घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत असून, अचूक आणि विश्वासार्ह माहिती नोंदविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविली जात आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक, निवास, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत विकास यांसारख्या क्षेत्रांतील धोरणनिर्मितीसाठी आधारभूत ठरणारी व्यापक प्रक्रिया आहे. नागरिकांकडून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे विविध शासकीय योजना आणि सेवा…

Read More

उपायुक्त सचिन पवार यांनी केले मार्गदर्शन पिंपरी, (हिंदवी न्यूज) – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि महसूलवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाला भेट दिली. यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी या शिष्टमंडळाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी मालमत्ता कर व्यवस्थापनातील विविध प्रक्रिया, महसूलवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाधारित प्रणालींबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. डिजिटल प्रणाली, जीआयएस सर्वेक्षण आणि…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.  नेहरूनगर येथील भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,नगरसदस्य राहूल भोसले, नगरसदस्या सारिका मासुळकर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)– पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा. तसेच नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घ्या, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. याशिवाय अनधिकृतपणे जाहिरात फलक किंवा विविध ठिकाणी पत्रके चिकटवून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश डॉ.: सूर्यवंशी यांनी यावेळी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध विभागांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी सूचना देताना ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा…

Read More

पिंपरी,(हिंदवी न्यूज )-पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजय मराठे यांची मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे आयोजित मराठी पत्रकार संघाच्या महाअधिवेशन २०२६ दरम्यान संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या भव्य अधिवेशनाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, विधान भवनाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रसिद्ध प्रवचनकार गौर गोपालदास, सरिता कौशिक, निलेश खरे, मृणालिनी नानीवडेकर तसेच संघाचे उपाध्यक्ष विवेक इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकारिता क्षेत्रातील योगदान, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग याची दखल घेत संजय…

Read More

मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात घोषणा मुंबई, (हिंदवी न्यूज) – मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ (दि.९ जून) यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती  महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक…

Read More

घर खरेदीपूर्वी परवानग्या तपासा. अनधिकृत बांधकामांपासून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात निगडी येथील रुपीनगर मेन रोड, तळवडे येथील गजानन हौसिंग सोसायटी परिसरात सुरू असलेल्या चार आर.सी.सी. स्वरूपातील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम अनधिकृत असल्याबाबतचे नोटीस बोर्ड लावण्यात आले असल्याची माहिती फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी दिली आहे. ही बांधकामे महापालिकेच्या बांधकाम नियमावली व विकास नियंत्रण नियमांचे उल्लंघन करून रेड झोन मध्ये उभारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकाम धारकांना नोटीस बजावण्यात आली असून या बांधकामांवर लवकरच निष्कासनाची कार्यवाही प्रस्तावित असून, नियमानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संबंधित…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधितांवर कठोर कारवाई करत ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. “क” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील सेक्टर १३, चिखली येथे उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जैववैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट पर्यावरण प्रदूषणास कारणीभूत ठरत असून नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण करू शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने कारवाई करत संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,सहायक आयुक्त किरणकुमार मोरे तसेच…

Read More

५०० हून अधिक कचरा वेचकांनी घेतला सहभाग पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) अंतर्गत शहरातील कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास व सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून आतापर्यंत ५०० हून अधिक कचरा वेचकांनी सहभाग नोंदविला आहे. एनएसकेएफडीसी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणामध्ये व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई) वापर, प्रथमोपचार, आर्थिक साक्षरता, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत योजना, स्वयंसहाय्यता गटांची स्थापना आणि आधुनिक कचरा संकलन वाहनांसाठी उपलब्ध अनुदान योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेच्या…

Read More