Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.  पिंपरी वाघेरे येथील भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,नगरसदस्य विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसदस्य प्रभाकर वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, उषा वाघेरे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

 घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेची विशेष कार्यशाळा पिंपरी, (हिंदवी न्यूज) – केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. एस.ओ. ३८८ (अ) द्वारे घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ जाहीर केले असून १ एप्रिल २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही घनकचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जुनी सांगवी प्रभाग क्र. ३२ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासन कारवाई करण्यात आली. या  कारवाईमध्ये मधुबन नगर व ममता नगर परिसरातील अंदाजे ४८० चौरस मीटर क्षेत्रफळाचे २ आर.सी.सी. अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान उप अभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे तसेच महानगरपालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक शाबोद्दिन बागवान, प्रफुल्ल भोकरे व सुरज माने यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या मोहिमेस महाराष्ट्र…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज )– जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस जनजागृती दिन” निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय), पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त ममता शिंदे व दिव्यांग भवनच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाद्वारे मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मार्गदर्शन व आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनाचे महत्त्व आणि या आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याची…

Read More

 नागरिकांनी नियम पाळण्याचे आयुक्तांचे आवाहन पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत झोपडीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली. कारवाईदरम्यान कार्यकारी अभियंता उमेश मोने, उपअभियंता संदिप पाडवी, महेंद्र देवरे, प्रशांत कोतकर, सुनिल दांगडे, सुनिल हरिदास तसेच कनिष्ठ अभियंते सतीश डांगे, अशोक पाटील, वनिता बवले, योगेश शेवलकर, विशाल…

Read More

२ लाख ४९ हजार नागरिकांनी घेतला १० टक्के सवलतीचा लाभ पिंपरी, (हिंदवी न्यूज) –  महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष (२०२६-२७) मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दि. १ एप्रिल २०२६ ते ४ जून २०२६ या कालावधीत २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील कर संकलन मोहिमेला सकारात्मक सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ७८ हजार १७ अधिक मिळकतधारकांनी आपल्या मालमत्तेचा कर भरला आहे, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. महापालिकेकडून मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या  वतीने उद्योग नगर केंद्राच्या मैदानात वृक्षारोपण  करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे गीता भांदुर्गे (अप्पर  सचिव पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई), सिकंदर घोडके (टीम लीडर इ सी ए), शारदा मुंडे (समाजप्रबोधनकार )तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुण पवार (वृक्ष मित्र पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन) यांच्या उपस्थितीत जांभूळ, चिंच, साग, आंबा, कडूनिंब अशा विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी सामूहिकपणे पर्यावरण संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली, कार्यक्रमाला कामगार भूषण मोहन गायकवाड, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, वसंत भांदुर्गे, मोहम्मद शरीफ मुलानी, स्वानंद राजपाठक, राजेश हजारे, शिवराज शिंदे, सूर्यकांत बरसावडे, तानाजी एकोंडे, बाळासाहेब साळुंखे, सुभाष चव्हाण, भरत शिंदे,…

Read More

प्रकृती परमात्म्याचा अमूल्य उपहार – तिचे संरक्षण आपली जबाबदारी पिंपरी,(हिंदवी न्यूज)- संत निरंका. मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने ५ जून रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्रातील खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा आणि सोमेश्वर यांसह देशभरातील १८ प्रमुख पर्वतीय व पर्यटनस्थळांवर सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन प्रेरणा आणि दिव्य आशीर्वादाने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान पार पडले लोणावळा आणि खंडाळा येथे सकाळी ९ वाजल्यापासून निरंकारी मिशनतर्फे लोणावळा नगरपरिषदेच्या सहकार्याने भव्य वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लोणावळा–खंडाळा परिसरातील खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवन तळे, कावेरी फार्म,…

Read More

फ प्रभाग कार्यालयाच्या वतीने ३५० चौरस मीटर क्षेत्रातील दोन इमारतींवर कारवाई  पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एफ प्रभाग कार्यालयाच्या वतीने गजानन हाउसिंग सोसायटी व परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ३५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन इमारतींवरील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आले. ही कारवाई फ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी महापालिकेचे ३० जवान, १० पोलीस कर्मचारी, संबंधित बिट निरीक्षक तसेच बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता उपस्थित होते. परिसरातील बहू मजली अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी जॉ क्रशर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. तसेच इतर अनधिकृत बांधकामावर प्रभावी कारवाई करण्यासाठी Jaw Crusher मशीनही मागविण्यात…

Read More

पर्यावरणदिनी वृक्षारोपण, नदी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प पिंपरी, (हिंदवी न्यूज)- मोदी सरकारच्या बारा वर्षेपूर्ती व ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याचं नियोजन करण्यात आले आहे.  ५ जून रोजी सकाळी सात ७ वाजता या वृक्षारोपणाची सुरुवात दुर्गा टेकडी येथे एक हजार वृक्षारोपण करून ,संपूर्ण दिवसभरात चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा तीनही विधानसभेमधील १४ मंडले ते बूथ स्तरापर्यंत वृक्षारोपण होणार आहे भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे या अभियानाचे जिल्हा संयोजक आहेत तर सहसंयोजक म्हणून मनोज तोरडमल व रमेश वहिले…

Read More