Author: Hindavinewsnetwork@gmail.com

१४० जागांसाठी कॅप राऊंडद्वारे दिले जाणार प्रवेश; विद्यार्थिनींसाठी निःशुल्क अर्ज सुविधा उपलब्ध पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) या संस्थेत ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेतील सर्व प्रवेशित जागांवर शासन नियमावली व आरक्षणानुसार कॅप राऊंड प्रणालीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली आहे. कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, डी.टी.पी., कॉस्मेटोलॉजी, फॅशन डिझायनिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊसकीपिंग हे प्रत्येकी एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण एवढी आहे. तर संस्थेच्या वतीने…

Read More

*स्वच्छ हरित पिंपरी चिंचवडकडे आणखी एक पाऊल; माझी वसुंधरा ७.० अभियानास ५ जून रोजी होणार सुरुवात पिंपरी, (हिंदवी न्यूज ) – पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित शहर संकल्पनेला बळ देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच, उद्यान विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ५) सकाळी ७.०० वाजता दुर्गा देवी टेकडी येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे. ‘हरित पिंपरी चिंचवड, स्वच्छ पिंपरी चिंचवड’ या संकल्पनेवर आधारित या अभियानांतर्गत वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, झोन ७ आयोजित इंद्रधनू सप्तरंगी सेवा सोहळा हाॅटेल ब्लू वाॅटर, पुनावळे येथे उत्साहात पार पडला. यावेळी आरोग्य, पर्यावरण, बालआरोग्य, दुर्धर व्याधी उपचार, शिक्षण, युवासक्षमीकरण आणि सामाजिक सेवाकार्य या सात आयामांसाठी २०२५ – २६ या कालावधीत झोन ७ मधील सात क्लबनी केलेल्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ राजेश आगरवाल, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. एल. जोशी, एम. सी. सी. लायन विजय सारडा, झोन चेअरपर्सन हिरामण राठोड आणि समन्वयक राजेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह झोन ७ मधील अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सभासद यांची मोठ्या संख्येने…

Read More

पिंपरी,(हिंदवी न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने  गुरुवारी (४जून ) प्रभाग क्रमांक १८ चिंचवडगाव येथे  नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका मनीषा चिंचवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिंचवड काळेवाडी मंडल अध्यक्ष अ‍ॅड हर्षद नढे, सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, डॉ. अजित जगताप, लक्ष्मण माहुरे, प्रसाद परब, महेश भोईर, हरिभाऊ मोहिते, सुभाष पंडित, मधुकर कुलकर्णी, अमेय देशपांडे, महानंदा भोईर, उद्यान विभागाचे नाळे साहेब, कांबळे साहेब व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज )- किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा यंदा दि. ५ व ६ जून रोजी दुर्गराज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या लोकोत्सवाला समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे व जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दि.६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य सार्वभौम सत्तेच्या रूपाने जगासमोर उभे राहिले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ…

Read More

‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान पिंपरी, (हिंदवी न्यूज) –  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन प्रेरणादायी आशीर्वादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त भारतातील १८ प्रमुख पर्वतीय पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘Beat Plastic Pollution’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित नसून “सेवा, सुमिरण आणि सद्भाव” या तत्त्वांद्वारे निसर्गसंरक्षणाची एक आध्यात्मिक साधना म्हणून साकारला जात आहे. या अभियानात स्वयंसेवक, सेवादल सदस्य, श्रद्धाळू आणि…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज ) –  सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर, किवळे -रावेत संघाचा मे महिन्यातील सभासद अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघाच्या 36 सभासदांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित जुन्या- नव्या मराठी, हिंदी गीतांची कराओके मैफिल “स्वर यात्रा” या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक निलेश तरस यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर यात्रा कार्यक्रमात रोहिदास पिलाने, शिवकांत जैस्वाल, सुमंगेश कुलकर्णी, भीमाशंकर जाधव, बाळासाहेब जगदाळे, बाळासाहेब क्षीरसागर, मुरलीधर भोलणकर, स्नेहा मुळे, प्रेरणा पाटील, विजय उपासनी या कलाकारांनी विविध मराठी, हिंदी भावगीत, भक्तीगीत, लोकगीत, फिल्मी गीत सादर केले. त्यास उपस्थित रसिक प्रेक्षकांनी प्रत्येक…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २४, मौजे थेरगाव येथील लेमनट्री हॉटेल ते मोरया बॅन्क्वेट हॉलदरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर  धडक कारवाई करण्यात आली. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ३० ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईत सुमारे १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे पाडण्यात आली. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांच्या अधिपत्याखाली पार पडली. या कारवाईमध्ये उपअभियंता सुनील बेळगावकर व जयवंत रोकडे यांच्यासह पालिकेच्या धडक कारवाई पथकातील…

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी  करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत कण्हेरे, विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल) कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या समवेत घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज संदर्भात नुकतीच बैठक पार  पडली. त्या बैठकीत कंपनीने कुशल मनुष्यबळ प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून याबाबत महापालिकेने सहकार्य करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे उपरोक्त विषयांकित प्रकरणी एमएनजीएल यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळावा घेण्यात आला. यात संस्थेमधील प्लंबर या ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थ्यांशी समक्ष संपर्क साधून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी विषयास अनुसरून माहिती…

Read More